नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर

Go down

दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 9:00 pm


दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर ऊर्फ आचार्य कालेलकर ऊर्फ काका कालेलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. थोर स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी, समाज सुधारक, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक, इतिहासकार, शिक्षणतज्ञ आणि पत्रकार असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.

काकासाहेबांचा जन्म १८८५ साली सावंतवाडीजवळच्या बेलगुंडी या गावी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी 'राष्ट्रमत' या दैनिकात त्यांनी संपादकीय विभागात काम केले. काही काळ बडोदा येथील गंगाधर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. 'या विद्यालयात सरकारविरोधी कारवाया चालतात' असे कारण दाखवून ब्रिटिश सरकारने हे विद्यालय बळजबरीने बंद करविले.

गंगाधर विद्यालय बंद पडल्यानंतर काकासाहेब महात्मा गांधींच्या गुजरातमधील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी म. गांधींच्या 'सर्वोदय' या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. गांधीजींच्या प्रेरणेमुळे गुजरात विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही काळ ते या विद्यापीठाचे कुलगुरूही होते. गुजराती जनतेने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. गुजराती लोक त्यांना 'सवाई गुजराती' म्हणत असत.

हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी खूप काम केले. त्यासाठी 'हिंदुस्थानी प्रचार सभे'च्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. भारत एक होण्यासाठी हिंदी भाषेचा प्रसार होणे महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केले. बर्‍याच ठिकाणी ते पायी फिरले. त्यांच्या या भारत भ्रमणाच्या अनुभवांवर त्यांनी गुजराती, हिंदी आणि मराठीमध्ये विपुल लेखन केले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर काकासाहेब बारा वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे १९५३मध्ये 'मागास वर्गीय आयोग' नेमण्यात आला. काकासाहेब या आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाने १९५५ साली आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात दलित आणि अस्पृश्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.

इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमधून कालेलकरांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखन आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने १९६४ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या लेखनक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना १९६५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला, तर १९७१ साली साहित्य अकादमीचे सन्मान्य सदस्यत्व बहाल करण्यात आले.

काकासाहेबांना दीर्घायुष्य लाभले, १९८१ साली वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही