Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
सुमती मोरारजी
:: विविधा :: व्यक्ति परिचय
पृष्ठ 1 - 1 पैकी • Share •
सुमती मोरारजी

व्यावसायिक जलवाहतुकीमध्ये जगभरात पुरुषांचा दबदबा आहे. या व्यवसायात स्त्रिया अभावानेच आढळतात. ही परिस्थिती भारतातच नव्हे, तर जगाभरात सर्वत्र आहे. पण पुरुषांच्या या क्षेत्रात धडाडीने काम करणारी पहिली भारतीय महिला म्हणजे श्रीमती सुमती मोरारजी.
सुप्रसिद्ध `सिंधिया स्टीम नेव्हीगेशन' या शिपिंग कंपनीचे मालक नरोत्तम मोरारजी यांच्या सुमती या स्नुषा. श्रीमती सुमती यांचा जन्म १९०३ साली झाला. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी म्हणजे १९२३ साली श्रीमती सुमती `सिंधीया' कंपनीच्या व्यवस्थापन विभागात रूजू झाल्या. स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या स्वातंत्र्यचळीचा परिणाम श्रीमती सुमती यांच्यावर झाल्याशिवाय राहिला नाही. आपले समुद्रावरचे साम्राज्य बाजूला सारून त्या १९४२ ते १९४६च्या दरम्यान भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभागी झाल्या. त्या काळात त्यांनी भूमिगत होऊन स्वातंत्र्याच्या चळवळीला हातभार लावला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या परत कंपनीत रूजू झाल्या. श्रीमती सुमती यांनी १९७९ ते १९८७पर्यंत कंपनीचे अध्यक्षपद भूषविले. `सिंधीया स्टीम नेव्हीगेशन'च्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे १९८८ साली सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली. पण त्यांनंतरही १९९२पर्यंत श्रीमती सुमती अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या.
जागतिक जहाज मालकांच्या संघटनेच्या पहिल्या महिला प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला. एवढेच नव्हे, तर १९७० साली लंडन स्थित `वर्ल्ड शिपिंग फेडरेशन'च्या उपाध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला.श्रीमती सुमती यांनी सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटविला. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील सिंधी बांधवांना जलमार्गे भारतात आणण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे केले.
त्यांच्या जलवाहतुकीतील बहुमोल योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९७१ साली `पद्मविभूषण पुरस्कार' देऊन सन्मानित केले.
श्रीमती सुमती मोरारजी यांना मुंबई येथे वयाच्या ९१व्या वर्षी, २९ जून १९९८ रोजी हृदयक्रीया बंद पडून मृत्यू आला.
शुभांगी मां

aplemarathijagat- Member
- Posts : 47
Join date : 15/05/2012
:: विविधा :: व्यक्ति परिचय
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
» ई विश्व आणि टपालखाते
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा