नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


भेंडीचा पिवळा रस्सा

Go down

भेंडीचा पिवळा रस्सा

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 8:24 pm



असं म्हणतात की दर चार कोसावर बोलीभाषेत बदल होतो. माझं तर असं निरीक्षण आहे की, दर दहा कोसावर भाजीच्या रस्स्याची चव बदलत असते. अगदी प्रयोग पहायला हरकत नाही. या गावाहून दुसर्‍या गावाला गेलं की रस्सा म्हणजे ग्रेव्हीत बदल होतोच.याचं कारण म्हणजे वापरण्यात येणारे मसाले, फोडणी देण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे तयार करणारे हात यांच्यात सतत वेगळेपण असतं.

आतापर्यंत अनेक भाजीचे रस्से आपण लाल, पांढरे, हिरवे पाहिले आहेत. परंतु पिवळ्या ग्रेव्हीची मजा काही औरच असते. परवा एका मित्राकडे जेवायला बोलावलं होतं. शुद्ध शाकाहारी बेत होता. समोर डिश आली आणि मी पहातच राहीलो. पिवळी ग्रेव्ही असणारी भेंडीची भाजी खातांना मस्तच वाटत होती. (भेंडी म्हटली म्हणजे जेवणात टिफीनचा डब्बा आठवतो.)

जेवण करत असतांनाच पिवळी ग्रेव्हीची भेंडी कशी बनवतात याची माहिती घेतली.

ग्रेव्हीसाठी साहित्य पुढील प्रमाणे- हिरवीगार कोवळी भेंडी सर्वसाधारणपणे पाव किलो (चार माणसे आरामात खाऊ शकतात), अर्धी वाटी आंबट दही, एक चमचा आल्याचा कीस, दोन हिरव्या मिरच्या, चवी पुरती साखर, जाडसर शेंगदाणा कुट दोन चमचे, एक चमचा कॉर्नफ्लोअर, फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे, चवीसाठी थोडे मीठ.

सर्वप्रथम भेंडी धुवून घ्यावी. देठ काढून भरलेली भेंडी करतो तशी मध्यभागी चिर द्यावी. दही, आल्याचा कीस, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दाण्याचा कुट एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. नंतर तूपाची फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीत घालून परतावी. भेंडी मऊ होईपर्यंत दही घालू नये. नंतर दही, कुट आणि अर्ध्यावाटीत पाणी घेऊन त्यात कॉनफ्लोअर टाकावा. हे साहित्य भेंडीवर घालावे. अर्धाचमचा हळद टाकावी. गॅस मंद ठेवावी. ऊकळी आल्यानंतर भेंडीसह यलो ग्रेव्ही काढावे. सजावटी साठी नारळ चव, हिरवी कोथिंबीर घालावी. साध्या भाता बरोबर यलो ग्रेव्ही उत्तम लागते.

विशेषत: नेहमीचे वरण, आमटी खाऊन कंटाळलेल्यांना यलो ग्रेव्हीची चव निश्चितच आवडेल.

ग्रेव्ही म्हणजे रस्सा जसा असेल तशी चव रंगतदार होत जाते. रस्स्याशिवाय जेवण पूर्ण होतच नाही. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भात तर रस्सेदार भाजी असल्याशिवाय जेवण झाल्याचे समाधान मिळतच नाही.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही