Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
महिला सक्षमीकरणातील पुढचे पाऊल : सिंधुदुर्ग जिल्हा महिला उद्योग भवन
:: स्त्री शक्ती
पृष्ठ 1 - 1 पैकी • Share •
महिला सक्षमीकरणातील पुढचे पाऊल : सिंधुदुर्ग जिल्हा महिला उद्योग भवन
उद्योग, बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे व सौ.निलम राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा जिजाऊ महिला उद्योग भवन संकुलाचे उद्घाटन नुकतेच झाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश ठेवूनच या भवनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे या उद्योग संकुलात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळांवर प्रक्रिया करून त्यातून नगदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक साधनसुविधा निर्माण करण्यात आली आहे.
महिला बचतगटांना सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या, त्यासाठी प्रशिक्षण आणि पतपुरवठा तसेच उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ मिळवून देणाऱ्या साधन सुविधा या महिला उद्योग संकुलात एकाच छताखाली निर्माण करण्यात आल्या आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महिला व बालविकास मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संकुलाची पाहणी केली. राज्यातील महिलांना सक्षम करणारा महत्वाचा प्रकल्प असल्याचे स्पष्ट करुन महिला उद्योग भवनाचा हा पॅटर्न आदर्श असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. सौ.निलम राणे यांच्या या उपक्रमाला मुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्री यांनी मोकळेपणाने दाद दिली.
मुंबई-गोवा महामार्गावरील या महिला उद्योग भवनासमोरून जाणारा कोणीही प्रवासी अगर पर्यटक निश्चितपणे या संकुलाकडे वळेल. त्या ठिकाणी क्षणभर थांबून कोकणी-मालवणी भोजनाच्या स्वादाबरोबरच कोकणातल्या फळफळावळीपासून निर्माण होणाऱ्या या विविध खाद्यपदार्थांचा स्वादही घेईल. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध प्रकारच्या ५० स्टॉल्समधील कोकणी मेवा तसेच मालवणी मुलखातील अन्य वस्तू, कलाकृती खरेदी करेल, अशा प्रकारची संकल्पना या संकुलाची उभारणी करताना केलेली दिसून येते. या ठिकाणी येणारा प्रवासी, पर्यटक तसेच त्यांची मुले त्याठिकाणी काही काळ थांबावीत या दृष्टीने या ठिकाणी खाद्य पदार्थांच्या मॉलबरोबर त्यांनी या परिसराचे उत्तमप्रकारे गार्डनिंग केले आहे.
विविध प्रकारच्या फुलझाडांबरोबर वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचे तसेच फुलपाखरांचे उद्यान याठिकाणी निर्माण करण्यात आले आहे. एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी कल्पकतेचा आणि नाविन्यतेचा परिपूर्ण वापर करण्यात आला आहे. राणे यांचे कोकण विकासाचे व्हिजन त्यांनी या ठिकाणी प्रतिकात्मकरित्या राबविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात महिला उद्योग भवन खाद्यपदार्थांच्या खरेदीचे जसे जिल्ह्यातील एक प्रमुख केंद्र बनेल, त्याचप्रमाणे प्रवासी व पर्यटकांना आवर्जून भेट द्यावेसे वाटणारे एक उत्तम पर्यटन केंद्रही बनेल यात शंकाच नाही.
राज्यातील मध्यमवर्गीय व कष्टकरी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्यात महिला बचतगटांची चळवळ राबविण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी या बचतगटांच्या माध्यमातून महिला पारंपरिक खाद्य पदार्थ बनवतात. सिंधुदुर्गात प्रामुख्याने पापड, कुळीथ पीठ, नाचणी पीठ, विविध प्रकारचे लाडू, कोकम, कोकम सरबत, आंबा वडी, आंबा पोळी, फणस पोळी वगैरे स्थानिक उपलब्ध मालावर आधारित खाद्यपदार्थ बनविले जातात. परंतु हे सर्व पदार्थ पारंपरिक पद्धतीने घरामध्ये बनविले जाते. या खाद्यपदार्थांची निर्मिती शहरी बाजारपेठेतील स्पर्धेत टिकवण्याच्या दृष्टीने अधिक दर्जेदार, टिकाऊ आणि स्वादिष्ट तसेच आरोग्याच्या दृष्टीने जास्त परिपूर्ण व्हावी तसेच बाजारपेठेतील स्पर्धेतील मार्केटिंगच्या मानसिकतेनुसार या वस्तू ग्राहकांनी चटकन खरेदी कराव्यात यासाठी त्या खाद्यपदार्थांचे आकर्षक व लक्षवेधी अशा प्रकारे पॅकिंग केले जायला हवे. परंतु अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन अगर त्यासाठी आवश्यक त्या साधनसुविधा महिला बचतगटांसाठी आतापर्यंत निर्माण झालेल्या नव्हत्या. त्यामुळे महिला बचतगटांनी गावागावात घराघरात निर्माण केलेल्या या खाद्यपदार्थांची विक्री होणे कठीण बनले होते. मात्र आता ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक समृद्ध आणि कृतीशिल योजना राणे दांपत्यांनी यानिमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील महिलांनी व त्यांच्या बचतगटांनी करून स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
» ई विश्व आणि टपालखाते
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा