नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


जावे तंत्रज्ञानाच्या गावा! -मुक्तपीठ

Go down

जावे तंत्रज्ञानाच्या गावा! -मुक्तपीठ Empty जावे तंत्रज्ञानाच्या गावा! -मुक्तपीठ

लिखाण  Admin on Wed May 16, 2012 12:57 am

आजच्या जगात तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय काही खरं नाही! त्यातही कॉम्प्युटर न येणं म्हणजे हद्दच झाली. मी या सगळ्यातून गेलोय. त्यात गंमत केली ती "फेसबुक'ने. आता मात्र मीच "फेसबुक'वर जास्त असतो...

भा रत देशाने जागतिकीकरणात प्रवेश केलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जसे कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, थ्री-जी यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काळासोबत बदलणे गरजेचे आहे. जो नाही बदलणार त्याची माझ्यासारखी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. साधारणपणे 2009 ची घटना असेल. मी आणि बायकोने (सुमेधा) कॉम्प्युटर घेण्याचा विचार केला. त्यानुसार तो घेतलादेखील. सुमेधाने कॉम्प्युटरमध्ये पदवी घेतल्यामुळे तिला तो कसा चालवायचा याबद्दल बरीच माहिती होती; पण माझा आणि कॉम्प्युटरचा दूरदूरपर्यंतही संबंध नव्हता. तिच्या सल्ल्यानुसार मी "एमएससीआयटी'चा क्‍लास लावला. क्‍लास अगदी मजेत चालला होता. रोज नवनवीन शब्द कानावर पडत होते. काही समजत होते, काही डोक्‍यावरून जात होते. शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला आणि अगदी योगायोगाने ते ठिकाण केशवनगर मुंढवा निघाले; त्या ठिकाणी माझी सासूरवाडी आहे. सासू-सासऱ्यांना वाटले जावई घरी येणार म्हणून चांगला स्वयंपाक केला पाहिजे. (जावई सासरी गेल्यावर फक्त नॉनव्हेजच जेवतो!) कारण जावई मोठ्या युद्धाला जाणार होता आणि तो जिंकून आल्यावर स्वागत नको का करायला? मी परीक्षा केंद्रावर गेलो. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर परीक्षा सुरू झाली. जमेल तसा पेपर सोडवीत होतो. परीक्षा संपल्यानंतर माझा कॉम्प्युटर सोडून प्रत्येकाच्या स्क्रीनवर फुलांचा गुच्छ आला होता. म्हणजे मी नापास झालो होतो. आता काय करायचे? सासरी कसे तोंड दाखवणार? पण हिंमत हरलो नाही, हिंमत हरेल तो कसला जावई? घरी गेलो. सगळ्यांनी हसून स्वागत केले. परीक्षेबद्दल विचारले. मी म्हणालो, मी सर्व प्रश्‍न सोडवले; पण काही तरी बिघाड झाला होता, उत्तर सेव्ह होत नव्हते म्हणून मला कमी गुण मिळाले. यावर सासरे म्हणाले, होते चूक कधीकधी मशिनकडून. (भारतामध्ये मशिन चुकेल, पण जावई कधीच चुकत नाही बरं का!) आम्ही जेवायला बसलो. नॉनव्हेज असल्यामुळे मीही जास्त आढेवेढे न घेता मनसोक्त जेवलो. अर्थात घरी आल्यावर बायकोने हजेरी घेतली ते वेगळे सांगायला नको!

असाच एक गमतीशीर प्रसंग माझ्याबाबत घडला होता. आतापर्यंत माझ्या ज्ञानाबाबत आपल्याला कल्पना आली असेलच. मला माझे मित्र नेहमी विचारत होते, तू फेसबुकवर आहेस का म्हणून. तू आम्हाला रिक्वेस्ट पाठव वगैरे. मी आपला नुसते हो म्हणायचो (फेसबुक कशासोबत खातात हेच मुळी माहीत नव्हते). मी सुमेधाला म्हटले, माझे फेसबुकवर खाते उघडून देणार का? तिने आश्‍चर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुम्हाला कशाला हवे आहे? कॉम्प्युटरवर कधी बसत नाही. मी विनंती करत म्हणालो, दे ना उघडून. याच्यापुढे बसत जाईन. आम्ही दोघे कॉम्प्युटरसमोर बसलो आणि वेबसाईट उघडून आवश्‍यक तो फॉर्म भरला. मी आपला कुतूहलाने एकटक पाहत होतो. पाच मिनिटांनंतर ती तिचा मेल उघडून चेक करू लागली. मित्र-मैत्रिणींसोबत चॅटिंग सुरू केले. मला वाटले, खाते उघडायला वेळ लागत असेल म्हणून ती तिचे काम करत आहे. मी आपला उत्सुकतेने पाहत होतो. आता मेसेज येईल, माझे मित्र दिसतील; पण तसे काहीच चित्र दिसत नव्हते. आता मात्र माझी सहनशक्ती संपत चालली होती. एखाद्या व्यक्तीला खूप भूक लागली आहे आणि तो जशी अन्नाची वाट पाहतो तसे माझे झाले होते. शेवटी घाबरत घाबरतच विचारले (नवरा असलो म्हणून काय झाले? अज्ञान फार वाईट असते!) माझे फेसबुकचे काय झाले! ती म्हणाली, तुमचे खाते कधीच चालू झाले. मी माझे फेसबुक बघत आहे. माझेच मला हसू आले आणि राग पण आला. फेसबुकवर काय चालू आहे तेसुद्धा मला कळत नव्हते. अज्ञानी असण्याची एक हद्द असते आणि ती कधीच मी पार केली होती.

म्हणून संगतो मित्रांनो, आधुनिकतेची कास धरा. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा आणि माझ्यासारखी होणारी फजिती टाळा. आता बायकोपेक्षा फेसबुकवर मीच जास्त असतो हे वेगळे सांगायला नको, कारण मला तेवढेच येते हो...!


सुशील शिवाजी म्हसदे
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही