Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
चला भटकंतीला
चला भटकंतीला
कुठं कुठं जायचं भटकायला हा उन्हाळी सुट्टीचा परवलीचा प्रश्न झालाय. बिझी शेडय़ुल आणि सुट्टीची मज्जा लुटताना करायच्या भटकंतीविषयीच्या या चार गोष्टी..
‘उन्हाळा' या उन्हाच्या काहिलीचा फील देणाऱ्या शब्दासोबत येते ती एक मस्त भलीमोठी लांबलचक सुट्टी ! एसीचा गारवा, आइस्क्रीमचा थंडावा आणि टीव्हीचा मनोरंजनवा कितीही गोड वाटला तरी आपल्याला भटकंतीही तेवढीच प्रिय असते. अलीकडं वीकएण्ड टुरिझमचं स्थान बळकट होत असलं तरीही शाळा-कॉलेजमधले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ही उन्हाळी सुट्टी खूपशी सोयीची ठरते.
सुट्टीच्या सुरुवातीलाच असणारी व्यक्तिमत्त्व विकासाची शिबिरं वगरे आटोपली की वेळ येऊन ठेपते मज्जा करायाची ! त्यासाठी हवं मनमुराद भटकायला.. हे भटकणं बऱ्याचदा असतं आपल्या गावात. हे गावचं घर स्वत:चं असतं किंवा आजोळ वगरे. तेही नसेल तर अलीकडं रिसॉर्टस्, घरगुती राहण्याची सोय असते. गाव आपलंच असतं. मग गावभर भटकता येतं उगीचच. एकदम निरुद्देश.. भटकताना दिसतो रानमेवा. तो खायचा. नदीत पोहणं किंवा समुद्रावरच्या रेतीत किल्ले बांधणं-शंखिशपले गोळा करणं, बलगाडीची सर करणं हे करावं. आंबे-फणसांवर ताव मारायचा. विहिरीतल्या कासवाशी दोस्ती करायची. शेतातून हुंदडायचं. ऊन ऊन दुपारी झाडाखाली बसून भाकऱ्या चोपायच्या नि निवांत ताणून द्यायची.. यासारखं दुसरं सुख नाही.
गावाला जायला सवड नि आवड नसेल तर ढेरसाऱ्या ट्रॅव्हल कंपन्या तुमच्या दिमतीला आहेत. त्यातले आपल्या आवडीचे पर्याय शोधा नि बाहेर पडा.. हां, तेवढाही वेळ नसेल तर तुमच्या जवळपासची ठिकाणं बघा. उदाहरणार्थ- ठाण्याजवळची ओवळेकरवाडी किंवा सगुणाबाग. पुण्याजवळची मोराची चिंचोली आणि निघोजचे रांजणखळगे. कर्नाळा, दाजीपूर किंवा तुम्हाला जवळ असलेली अभयारण्यं. नळदुर्गासारखे भुईकोट किल्ले. समुद्राची ओढ असेल तर केळवा बीचला जा किंवा हरिहरेश्वर-दिवेआगार गाठा.
समजा चार दिवसांची सुट्टीही मिळाली नाही तरी नाराज होऊ नका. मग आपल्या शहरातल्याच वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्या. मुंबईत राहून घारापुरीच्या बेटावर न गेलेले अनेकजण असतील.
राणीचा बाग, नेहरू प्लॅनेटोरिअम-सायन्स सेंटर, तारापोरवाला मत्स्यालय, म्युझिअम, आर्ट गॅलरी बघायची राहून गेलेली असेल तर ती बघता येईल. असं बघणं नको असेल तर सरळ लाँग ड्राइव्हला जा. रस्ता नेईल तिकडं.. मे बी तो रस्ता वांद्रे-वरळी सीिलकला जाईल, जुहू चौपाटीवर जाईल किंवा मरीन ड्राइव्हला जाईल.. किंवा आणखी कुठंही.. तिथं जा आणि एकदम रिलॅक्स व्हा. कारण रिलॅक्स होणं हाच तर सुट्टीचा मूळ उद्देश असतो. तो तर साध्य व्हायलाच हवा ना..
भटकंतीच्या टिप्स
* प्रत्येकाच्या खिशात आपली माहिती देणारं कार्ड हवं.
* कमीतकमी बॅग्ज घ्या. सॅक घेतल्यास ती सोयीची ठरते.
* प्रवासाच्या कालावधीनुसार कपडे घ्या.
* अभयारण्यात जाणार असाल तर रंगीत कपडे घालू नका. आरडाओरडा करू नका. फक्त निसर्गाचा आनंद घ्या.
* भटकताना कॅप, पाण्याची बॉटल, कॅमेरा, फर्स्ट एड बॉक्स वगरे घ्या.
* मोठा प्रवास असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
* प्रसंगी विमा उतरून घ्यावा.
* एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड कायम जवळ असावं.
* तिकिट्स, व्हाऊचर्स वगरे महत्त्वाची कागदपत्रं बॅगमध्ये नीट न विसरता ठेवा.

राधिका कुंटे
sandykul07- Posts : 4
Join date : 14/05/2012
:: भटकंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
» ई विश्व आणि टपालखाते
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा