नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


हेअर स्टाइल इन समर

Go down

हेअर स्टाइल इन समर Empty हेअर स्टाइल इन समर

लिखाण  sandykul07 on Tue May 15, 2012 9:50 pm

उन्हाळ्याच्या ऋतुतही तुमचा लूक स्टायलिश आणि आकर्षक ठेवण्यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज आहे असं नाही. कारण अनेक क्यूट हेअरकटचे पर्याय यंदाच्या समर सीझनमध्ये तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. किंबहुना तुम्ही जर तुमच्या आत्ताच्या हेअरस्टाईटला कंटाळले असाल तर एखादा ट्रेंडी हेअरकट करून तुमच्या लूकमध्ये चेंज आणण्यासाठी यंदाचा समर सीझन हीच नामी संधी आहे. म्हणूनच हेअरकटच्या लेटेस्ट फॅशन व ट्रेंडवर एक नजर.काही बेसिक हेअरकट कोणत्याही सीझन व प्रसंगात उठून दिसणारे असतात. यातला एक पर्याय क्सासीक बॉबकट. कानापर्यंतच्या उंचीचे आणि पूर्णपणे इनवर्ड टर्न असलेला बॉब फॉर्मल वा कॅज्युअल वेअर दोन्हीवर छान दिसतो. पण सध्या ट्रेंडमध्ये आहे टेक्चर्ड आणि चॉपी बॉब हे प्रकार. टेक्चर्ड बॉबमध्ये केसांना इनवर्ड वळवण्यापेक्षा लेअरकटप्रमाणे केसांना फ्री एन्ड कटींग ट्रीटमेंट दिलेली असते. त्यामुळे कमालीचा फॅशनेबल लूक तर मिळतोच पण केसांची खूप काळजीही घ्यावी लागत नाही. काहीसा विस्कलटेल्या केसांनाही हा कट शोभून दिसतो. तर चॉपी बॉब काहीसा लेअर बॉबसारखा दिसतो. केसांचा थिकनेस वरून खाली कमी होत गेल्याने यात चेहरा लहान दिसतो. कॅटवॉकसाठी अनेकदा मॉडेल्सना हा कट आवर्जुन दिला जातो,तो त्याच्या हटके लूकमुळेच..

यंदाच्या समर सीझन स्पेशल हेअरकटच्या पर्यायांमध्ये शॉर्ट लेन्थचे हेअरकट अधिक लोकप्रिय ठरले आहेत. पण बॉब किंवा स्टेप्ससोबत बॅग्ज हा लूक तुम्हाला अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. स्टेपकटमुळे केसांचा दाटपणा दिसून येतो त्यामुळे चेहरा खुलून दिसतो तसेच खूप मेनटेन ठेवण्याची गरज नसते. दोन-तीन महिन्यांनी ट्रीम केल्यावर हा कट चांगली हेअरस्टाईट देऊ शकतो. शिवाय डीप स्टेप्स घेतल्या तर मोठय़ा केसांसाठीही हा उत्तम पर्याय आहे.

फेदरकट कॅरी करायला इजी म्हणून आपल्याकडे लोकप्रिय आहे. पण चेहऱ्याची ठेवण व केसांची उंची यावरच हा कट करणे उत्तम.म्हणूनच लेअरकटची फॅशन पुन्हा रूढ होतेय. पातळ व सरळ केसांसाठी हा कट मस्त आणि सोज्वळ लूक देणारा ठरतो. यातही स्टेप्स विथ लेअर, लेअर विथ बॅग्ज अशी कॉम्बिनेशन्स आहेत. फेदर फ्लीप हा नवा प्रकार अलिकडे प्रचलित झालाय. या हेअरकटसोबत बहुतेक कोणतीही हेअरस्टाईल करता येणे शक्य आहे.त्यामुळे नव्वदीच्या दशकात खूप लोकप्रिय झालेला हा ट्रेंड पुन्हा रूळतोय.
समर सीझनमध्ये केसांच्या नैसर्गिक स्थितीला धरून असलेला कट केला तर केव्हाही चांगला. पण साधा यू कट किंवा स्टेप्सकटसोबत पॉनिटेल हे कॉम्बिनेशन छान जुळून येतं. पॉनिटेल कधीही ऑफ द फॅशन ठरलेली नाहीत.मध्यम उंचीवर बांधलेला पॉनीटेल स्पोर्टी व कॅज्युअल लूक देण्यास फायदेशीर आहे.तसेच यामुळे चेहऱ्याकडे लक्ष वेधलं जातं.कधीकधी मानेच्या खाली हलक्याने बांधलेला पॉनिटेल रिलॅक्स लूक देणारा ठरू शकतो.
मध्यम उंचीचे हेअरकट व त्यांची कॉम्बिनेशन्स यांचा पर्याय सध्या आहेच. पण मोठय़ा केसांसाठी साईड पार्टीग किंवा बन स्टाईट वेगळा चॉईस ठरू शकतात. अध्र्या केसांची एका बाजूने घातलेली वेणी एखाद्या विशेष प्रसंगावेळी तुमच्यावर नजरा रोखणारी हेअरस्टाईट ठरू शकते.तर केसांना नेहमीच्या डावीकडून असणाऱ्या वळणाऐवजी उजवीकडून वळवल्याने दिसणारा लूक तुम्हाला आवडू शकतो.

पिक्सी क्रॉप हेअरकट सध्या फॅशनजगतावर राज्य करत असून बॉयकट व बॉब यांच्या मधला कट असं याचं थोडक्यात वर्णन करता येईल. यामुळे मॉडर्न लूक तर मिळेलच पण आधीच्या तुमच्या हेअरकटपेक्षा हा एकदम मेकओव्हर करणारा लूक ठरू शकतो. केसांना कलर करून किंवा हायलाईट करून तुम्ही हेअरकट अधिक खुलवू शकता. काही हेअरकट हाईलाईट केल्याने एकदम मस्त दिसतात.

नेमका कुठला स्पेशल हेअरकट करायचा हे ठरवतांना तुमचा गोंधळ उडत असेल तर सोपा पर्याय म्हणजे आहे त्या हेअरकटला थोडं पॉलिशिंग करून घ्या आणि केस स्टेटनिंग च्या पर्यायाचा विचार करून बघा किंवा केसांची जातकुळी तर थोडी कुरळ्या वळणाकडे जाणारी असेल तर व्यवस्थित कर्ल करून घ्या. ‘कर्ल अण्ड बाऊन्स’ चा ट्रेंड मॉडेलिंगवाल्या ललनांमुळे खूपच फेमस झालाय. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आत्मविश्वास झळकू लागतो

sandykul07

Posts : 4
Join date : 14/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही