नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


जीवेत शरदः शतम्‌

Go down

जीवेत शरदः शतम्‌ Empty जीवेत शरदः शतम्‌

लिखाण  Admin on Wed Jun 19, 2013 1:08 am

फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना भारतीय परंपरेत अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. अगदी देवांचे वैद्यही अश्‍विनीकुमार आहेत, अशा संकल्पनांमधून हेच लक्षात येते. तसेच, राजवैद्य वगैरे राजवाड्यातील कुटुंबाची काळजी घेत असत. एखाद्या राजकुटुंबातील व्यक्‍तीचे हाड मोडले, तरी प्रथम त्या ठिकाणी राजवैद्यालाच पाचारण केले जात असे, त्याचा सल्ला घेऊन नंतर हाडवैद्यांचा उपचार घेतला जात असे. फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना केवळ भारतातच नव्हे, तर सर्व जगात ठिकठिकाणी रूढ होती. यामुळे रोगांना दूर ठेवणे शक्‍य होत असे व यदाकदाचित रोग झाले, तर ते पूर्णतः बरे करणे शक्‍य होत असे. 

"फॅमिली डॉक्‍टर' या संकल्पनेला 2003 मध्ये सुरवात झाली व आजचा हा 500 वा अंक सर्वांपर्यंत पोचत आहे. हा अंक 500 वा असला, तरी "फॅमिली डॉक्‍टर' आजही तरुण आहे. त्याचा ताजेपणा व उत्साह पहिल्या दिवसासारखाच आहे. आजही "फॅमिली डॉक्‍टर' असंख्य वाचकांपर्यंत पोचून सर्व वाचकांना त्याच उत्साहाने शंभर वर्षांचे दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रयत्न करतो. 

एखादी संस्था 25, 50, 100 वर्षांची झाली; तर उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. हीच गोष्ट प्रत्येक व्यक्‍तीलाही लागू पडते. प्रत्येकाने 100 वर्षे जगावे, असे दीर्घायुष्य ज्यांना मिळेल ते खरे नशीबवान. माणसाचे नशीब जन्मतः 100 टक्के ठरलेले नसते. चांगल्या नशिबासाठी ज्ञानाची, कर्माची व आशीर्वादाची जोड आवश्‍यक असते म्हणजेच आरोग्य तनाचे, मनाचे आणि प्रसन्नता आत्म्याची मिळावी म्हणून "फॅमिली डॉक्‍टर' प्रयत्न करतो. 

ज्या आई-वडिलांकडून शरीर मिळाले त्यांचे आरोग्य, गर्भावर जन्मपूर्वसंस्कार झाले का, जन्म कुठल्या ऋतूत झाला, जन्म कुठल्या रीतीने झाला, जन्मानंतर बालकावर संस्कार झाले का, लहानपणी कुठल्या सेवा-सोई मिळाल्या, कुठल्या प्रकारचे अन्न मिळाले, एकूण आयुष्यात येणारे आजार, माता-पित्यांना असलेले आजार व जीवन जगत असताना आजूबाजूचे वातावरण व परिस्थिती, यांचा जीवनावर काय परिणाम झाला, अशा सर्व एकत्रित परिणामांमुळे व्यक्‍तीचे आरोग्य ठरत असते आणि त्यावरच अवलंबून असते शतायुष्याकडे वाटचाल. 

माणसाच्या आरोग्याविषयी विचार करीत असताना, सल्ला देत असताना तसेच उपचार करीत असताना रुग्णाची अगदी जन्मपूर्व किंवा पालकांच्या आधीच्या पिढ्यांची माहिती असणे आवश्‍यक असते. ज्या ठिकाणी व्यक्‍ती राहते ते ठिकाण डोंगरावर आहे, समुद्रकिनाऱ्यावर आहे, आजूबाजूला कुठल्या प्रकारचे व्यवसाय, उद्योग कारखाने आहेत, त्याला कुठल्या प्रकारचे अन्न मिळू शकते, या सगळ्यांची माहिती वैद्याला व परिचारकाला असणे आवश्‍यक असते. रोग्याचे समाजातील स्थान, त्याची मानसिकता, त्याला मिळणाऱ्या सोई-सुविधा, त्याची सांपत्तिक परिस्थिती व त्याला येणाऱ्या अडचणी वगैरे माहितीचीही मदत निदान व उपचार करताना होते. एखादा मनुष्य फोनवर सांगत असलेली लक्षणे संगणकाला सांगून संगणकाने इलाज सुचविणे किंवा ही लक्षणे ऐकून जगाच्या पाठीवर कुठेतरी बसलेल्या कुणा डॉक्‍टरने इलाज सांगणे वेगळे आणि त्या व्यक्‍तीला, त्याच्या कुटुंबाला जाणणाऱ्या वैद्याने आयुर्वेदिक उपचार करणे वेगळे. ज्या वेळी वैद्य किंवा उपचारक रोग्याची, त्याच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन उपचार करीत असे आणि आयुर्वेदिक जीवनपद्धतीप्रमाणे आहार-विहार व संस्कार सुचवत असे, तेव्हा 100 वर्षे जगणे शक्‍य होत असे. 

फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना भारतीय परंपरेत अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. अगदी देवांचे वैद्यही अश्‍विनीकुमार आहेत, अशा संकल्पनांमधून हेच लक्षात येते. तसेच, राजवैद्य वगैरे राजवाड्यातील कुटुंबाची काळजी घेत असत. एखाद्या राजकुटुंबातील व्यक्‍तीचे हाड मोडले, तरी प्रथम त्या ठिकाणी राजवैद्यालाच पाचारण केले जात असे, त्याचा सल्ला घेऊन नंतर हाडवैद्यांचा उपचार घेतला जात असे. फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना केवळ भारतातच नव्हे, तर सर्व जगात ठिकठिकाणी रूढ होती. यामुळे रोगांना दूर ठेवणे शक्‍य होत असे व यदाकदाचित रोग झाले, तर ते पूर्णतः बरे करणे शक्‍य होत असे. 

भौतिकशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे क्ष किरण, लेझर वगैरे तंत्रांमुळे शरीराच्या आत नक्की काय घडते आहे, हे बघण्याची शक्‍यता निर्माण झाल्यावर आवश्‍यक असेल तेव्हा शल्यचिकित्सेद्वारे उपचार करणे सुलभ झाले. त्यामुळे शल्यचिकित्सेचा आधार अनेक वेळा घेतला जाऊ लागला. पण, अशा वेळीही फॅमिली डॉक्‍टरचे महत्त्व किंचितही कमी होत नाही. उपलब्ध असलेल्या गोष्टींपैकी नक्की कशाची आवश्‍यकता आहे, हे फॅमिली डॉक्‍टर अधिकाराने ठरवतो, जणू तो कुटुंबातीलच एक समजला जातो. एखाद्या फॅमिली डॉक्‍टरचे संबंध एखाद्या कुटुंबाशी अनेक पिढ्यांपासून असल्याचे दिसत असते. असे असल्यामुळे त्याची एकूण उपचारांसाठी ठरविलेली योजना प्रेमाची व आपुलकीची असते. 

एखाद्या जड वस्तूत जिवंतपणा आणता येत नाही, तसे मृत व्यक्‍तीतही जिवंतपणा आणता येत नाही. तसेच, कोट्यवधी रुपये मोजले म्हणजे आरोग्य मिळते, असेही नाही. आरोग्यासाठी केलेले निदान, औषध योजना, उपचार योजना या सगळ्यांची किंमत मोजता येण्याच्या पलीकडे असते. 

रोग्यावर उपचार करणे हा एक केवळ आर्थिक व्यवहार आहे, असे समजणे बरोबर नाही. फॅमिली डॉक्‍टर हा कुटुंबाचाच एक सदस्य असल्यामुळे तो वेळप्रसंगी पदरचे पैसे खर्च करूनही उपचार करण्यासाठी पुढे सरसावत असतो. तसेच, फॅमिली डॉक्‍टर हा नुसता उपचार न करता रोगाचे कारण, त्यावरील उपचारांची सखोल माहिती घरातील सगळ्यांना देतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्‍तींचेही रोगनिवारणासाठी सहकार्य मिळते आणि विश्‍वास व श्रद्धेने उपचार स्वीकारला जातो. 

शहरांच्या वाढीमुळे म्हणा, लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्‍टर नसल्याने किंवा आधुनिक वैद्यकात ही संकल्पना नसल्यामुळे म्हणा, फॅमिली डॉक्‍टरची संकल्पना हळूहळू कमी होत गेली, असे दिसते. ही उणीव दूर करण्याच्या दृष्टीने पुरवणीच्या स्वरूपात फॅमिली डॉक्‍टर घराघरांत पोचविण्याची कल्पना सुचली व ती अत्यंत यशस्वी झाली. यामुळे रोग व त्यावरील उपचार यांची माहिती मिळू शकली, तसेच रोग टाळण्यासाठी काय करावे किंवा घरगुती व प्राथमिक उपचार कसे करावेत, हेही समजू शकले. स्वास्थ्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय, रोग बरा करण्यासाठी काय करण्याची आवश्‍यकता आहे, घरगुती औषध कधी घ्यावे, वैद्यांचे औषध कधी घ्यावे, अन्य उपचार पद्धतीचा स्वीकार कधी करावा, हॉस्पिटलमध्ये कधी जावे, शल्यक्रिया कधी करून घ्यावी वगैरे सर्व गोष्टी साधारणपणे प्रत्येकाला कळू शकल्या, त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत झाली आणि आरोग्यपूर्ण रीतीने शतायुषी होण्याची आशा उत्पन्न झाली. महाराष्ट्रात तरी अनेकांनी या पुरवणीला आपल्या घरातील एका सदस्याचे स्थान दिले. रोज घरात येणारे वर्तमानपत्र इतर कुठलेही असले, तरी शुक्रवारच्या "फॅमिली डॉक्‍टर'च्या पुरवणीसाठी "सकाळ' वर्तमानपत्र घेणारे अनेक आहेत. यातून "फॅमिली डॉक्‍टर'ची वाटचाल सुरू झाली व आज आपल्या हातात 500 वा अंक येत आहे. 

[You must be registered and logged in to see this link.]
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही