नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


गुरूपोर्णिमा

Go down

गुरूपोर्णिमा           Empty गुरूपोर्णिमा

लिखाण  Admin on Thu May 24, 2012 6:29 pm

गुरूपोर्णिमा           4803_Mahas1
महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व इलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.

देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास! पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. ह्या राणीला दोन पुत्र झाले. पण ते दोघेही निपुत्रिक वारले. राज्याला वारस उरला नाही. राणी सत्यवती मनोमन व्याकुळ झाली आणि त्या तळमळीतून तिला एक वेगळीच कल्पना सुचली. ती कल्पना त्या काळच्या सामाजिक समजुतीला आणि रीतीरिवाजाला धरून होती. आपला पूर्वीश्रमीचा पुत्र व्यास याने अपला वंश वाढवावा अशा कल्पनेने तिने व्यासांनी नियोगपद्धतीचा अवलंब करुन आपल्या सुनांच्या ठिकाणी संतती निर्माण करावी, असा आग्रह धरला. व्यासांना हे मुळीच मान्य नव्हते. त्यांनी नानाप्रकारे आईला ह्या विचारापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सत्यवतीच्या अतीव आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही. स्वत:च्या मर्जीविरुद्ध त्यांना तिचे म्हणणे मानणे भाग पडले आणि सत्यवतीच्या दोन्ही सुनांना दोन मुलगे झाले. पहिला धृतराष्ट्र आणि दुसरा पंडू. धृतराष्ट्राची संतती कौरव आणि पंडूची संतती पांडव! ह्याच कौरव-पांडवांचे युद्ध हे महाभारताचे मुख्य कथाबीज. व्यासांचे कौरव-पांडव ह्या दोघांशीही असे रक्ताचे आणि नात्याचे संबंध होते. युद्ध होऊ नये म्हणून व्यासांनी कौरव-पांडवांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, यश आले नाही, युद्ध झाले. ह्या युद्धामुळे व्यासांची मन:स्थिती किती उद्विग्न आणि उद्धस्त झाली असेल त्याची कल्पना करता येते. युद्धात कोणीही हरला, तरी तो व्यासांचाच आप्तस्वकीय असणार होता. रणभूमीवर कोणाचेही रक्त सांडले तरी ते व्यासांचेच रक्त असणार होते.

गीतेच्या प्रारंभी जी अर्जुन-विषादाची वेदना प्रगटते, ती प्रत्यक्षात व्यासांचीच वेदना आहे. गीतोपदेश हा जणू व्यासांनी स्वत:च्या मनालाच केलेला उपदेश आहे.

व्यासांनी महाभारत लिहिले आणि धर्माने वागून सर्वांचेच कल्याण होते हे सांगत असूनसुद्धा माझे म्हणणे कोणी ऐकत नाही, असे वैफल्यग्रस्त उद्गार त्यांना पुढे काढावे लागले. व्यासांना आपली धर्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अतिउच्च स्थानी सन्मानाने बसविते.

''म्हणौनि भारतीं नाहीं तें न्हवे चि लोकीं तिहीं, एणें कारणें म्हणिपे पाहीं व्यासोच्छिष्ट जगत्रय''


असे ज्ञानोबा म्हणतात. व्यासांनी जगातील सर्व गोष्टींचा आस्वाद घेतला आहे, अनुभव घेतला आहे. प्रात:स्मरणात व्यासांच्या नमनाचा जो श्लोक आहे त्यात आधीच्या तीन, पुढची एक आणि मधले व्यास धरुन एकूण पाच पिढ्यांचा उल्लेख केलेला आहे. व्यासं वसिष्टनप्तारं, शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वंदे, शुकतातं तपोनिधिम् कोण? तर व्यास वसिष्ठांचा पणतू, शक्तीचा नातू, पराशराचा पुत्र आणि शुकाचा पिता असा जो निष्पाप तपानिधी व्यास त्याला मी नमस्कार करतो. ह्या श्लोकात खुद्द व्यासांना उद्देशून फक्त दोन विशेषणे वापरली आहेत. एक अकल्मषम् म्हणजे निष्कलंक आणि तपोनिधी म्हणजे श्रेष्ठ तपस्वी!

व्यास हे सर्व चराचराचे गुरु आहेत, धर्मगुरु आहेत. अध्यात्मगुरु आहेत, वाड्.मयगुरु आहेत, तत्त्वज्ञानाचे गुरु आहेत, व्यवहारज्ञानाचे गुरु आहेत आणि प्रापंचिक ज्ञानाचेही गुरु आहेत. गुरुपौर्णिमेच्या मध्यरात्री प्रत्यक्ष व्यास पृथ्वीवर अवतरतात आणि आपल्या भक्तांना तसेच परमार्थ मार्गावरच्या पांथस्थांना योग्य मार्गदर्शन करतात अशी परंपरागत दृढ श्रद्धा आहे. इतिहास पुराणे जे सांगतात त्यावरुन व्यासांनी जगाचा उदंड अनुभव घेतला. त्यांनी मानवी स्वभावाचे बारकाईने निरीक्षण केले. त्या निरीक्षणामधून पुढच्या पिढीने कसे वागले असता त्यांचे कल्याण होईल याचाही विचार त्यांनी सूक्ष्मपणे केला आणि दूरदर्शीपणाने महाभारत तसेच पुराणांमधून सर्वसामान्य माणसांसाठी काही आदर्श निर्माण करुन ठेवले. आदर्श कोणते, तर आदर्श माणसांचे आणि माणसांच्या वागण्याची ! ज्यांना सद्धर्म, अध्यात्म, परमार्थ यामधील उच्चश्रेणीचे ज्ञान हवे असेल त्यांच्यासाठी वेदांची योग्य जुळणी आणि मांडणी करुन ठेवली. व्यासांचे हे हिमालयाएवढे उपकार आहेत. उगाच का आपण प्रवचनाच्या किंवा वक्त्याच्या मंचाला 'व्यासपीठ' म्हणतो ?
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही