नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


गंधर्वगड

Go down

गंधर्वगड        Empty गंधर्वगड

लिखाण  Admin on Mon May 21, 2012 12:58 pm

गंधर्वगड        5053_Mahas
गंधर्वगड हे नाव काहीसे काव्यात्मक असले तरी गंधर्वगड हा एक किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात हा किल्ला असुन चंदगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावरील एका पठारावर आहे. किल्ल्यामध्येच गंधर्वगड नावाचे गाव आहे.

कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लज ते चंदगड असा गाडी मार्ग आहे. कोल्हापूरकडून चंदगडाकडे जाताना चंदगडाच्या अलिकडे १० कि.मी. अंतरावर वाहकुली गावाचा फाटा आहे. रस्त्याच्या डावीकडे फुटणार्‍या या फाट्यावर सध्या एक कमान उभी केली आहे. या फाट्यापासून गंधर्वगडावर जाणारा गाडीरस्ता केलेला आहे.

या गाडीरस्त्याने गडाच्या पदरामधील वाळकुळी गाव लागते. गावातून पंधरा मिनिटांच्या चालीनेच आपण गडावर पोहोचू शकतो अथवा गाडीमार्गाने डोंगराला वळसा घालूनही माथ्यावर जाता येते.

वाळकुळी गावाकडून आपण गंधर्वगडाची चढाई करतो. तुटलेल्या तटबंदीमधून आपला गडप्रवेश होतो. या बाजूला ढासळत चाललेल्या तटबंदीमध्ये दोन तीन बुरुज तग धरुन उभे असलेले दिसतात. या तटबंदीमध्ये चोरवाट आहे पण ती ढासळलेल्या चिर्‍यामुळे पुर्णतया बुजून गेलेली आहे. तटबंदीजवळ एक दहा फूट खोलीची छोटीसी विहीर आहे. विहीरीच्या तळाला एका कोपर्‍यात बादलीभर पाणी पाझरलेले दिसत होते. ते पाणी छोट्याशा भांड्याने काढून घागर भरण्यासाठी महीलांची आणि त्यांच्या रंगीबेरंगी प्लॅस्टीकच्या कळश्यांची रांग लांबवर लागलेली दिसत होती. कळशीभर पाण्यासाठी दिवस दिवस वाट बघणार्‍या महीलांकडे पाठ फिरवून मी चाळोबाच्या मंदिराकडे मोर्चा वळवला.

गंधर्वगडावरील चाळोबा हे गावातील लोकांचे ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान. या जुन्या छोट्याशा मंदिराचा पुर्णतया कायापालट करुन नवे मोठे मंदिर गावकर्‍यांनी उभारलेले आहे. मंदिरात चाळोबाचा मुखवटा आहे. मंदिराच्या परिसरात विरगळी पडलेल्या आहेत. बाजूलाच एका वास्तुचा भव्य चौथरा आहे.

मंदिराच्या जवळ असलेल्या शाळेच्या परिसरात काही वर्षापुर्वीपर्यंत गडकरी हेरेकर सावंत यांच्या वाड्याचे अवशेष होते. ते सर्व गावकर्‍यांनी नष्ट करुन टाकले व तेथे मुलांना खेळण्यासाठी सपाट मैदान केले. गंधर्वगडाचे गडपण अंशाअंशाने कमी होत चालले आहे.

इतरत्र अजूनही काही चौथरे आढळतात. गडाच्या माथ्यावरुन महिपालगड आणि कलानंदीगड तसेच ताम्रपर्णी नदीचे खोरे दिसते. गड पाहून गाडीवाटेने निघाल्यावर झाडाच्या सावलीत मारुतीरायांची मुर्ती विसावलेली दिसते. ना भिंती ना छप्पर अशी अवस्था असल्यामुळे कोणा भक्ताने झाडाच्या उंच फांदीलाच घंटा टांगली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये गंधर्वगडाची नोंद आहे. या शिवकालीन किल्ल्याची इ.स. १८४४ मध्ये इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. आज निसर्गाचा कोप आणि मानवाच्या अज्ञानाचा बळी ठरु पहाणार्‍या गंधर्वगडाला मनोमनी वंदन करुन आपण गड उतरु लागतो.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही