नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


संत खलजी

Go down

संत खलजी      Empty संत खलजी

लिखाण  Admin on Mon May 21, 2012 12:45 pm

संत खलजी      5244_Mahas
अनेक मुसलमान संतकवींनी मध्ययुगीन मराठी साहित्यांत मोलाची भर टाकली आहे. यासंबंधी मी 'मुसलमान सूफी संतांचं मराठी साहित्य' या माझ्या मुद्रणाधीन ग्रंथात सविस्तर विवेचन केलं आहे. साहित्य अकादमीतनं या संशोधन प्रकल्पासाठी ज्येष्ठ गौरववृत्ती दिली होती.

मध्ययुगीन मराठी संतसाहित्यात 'मुंतोजी' नामक दोन संतकवींचा उल्लेख आढळतो. त्यांपैकी पहिले 'वजीरुल मुल्क मुंतोजी खलजी' हे आहेत आणि दुसरे 'मुंतोजी बामणी ऊर्फ मृत्युंजय' हे आहेत. मुंतोजी बामणी ऊर्फ मृत्युंजय यांनी विपुल लेखन केलं आहे. मुंतोजी खलजी यांचं लेखन त्या त्यांच्या पूर्वीच्या मुसलमान मराठी संतकवींची माहिती उपलब्ध होत नाही. यावरून वजीरुल मुल्क मुंतोजी असं मानावं लागते. ते स्वत:ला 'वजीरुल्मुक' म्हणजे (प्र) देशाचे मुख्य प्रधान म्हणवितात. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आबासाहेब मुजुमदार यांनी मुंतोजी खलजी काळ इ.स. १४३५ ते १४५० असा मानला असला तरी स्थूल मानानं तो पंधरावं शतक मानायला हरकत नाही कारण इ.स. १४३५ ते १४५० असा कालोल्लेख मान्य केल्यास मुंतोजी खलजींचं आयुष्य केवळ पंधराचं वर्षांचं होतं व ते एवढ्या कालमर्यादेत 'वजीरुल्मुल्क' होणंही शक्य नाही. त्याचप्रमाणं त्यांनी ज्या दोन गहन विषयांसंबंधी म्हणजे ज्योतिषशास्त्र व संगीतकला या विषयी अभ्यास तर केलाच पण त्यांतील लक्षणीय ग्रंथांवर भाष्यलेखनाही केलं, असं मानण्यात तार्किक विसंगती संभवते. प्रौढ व्यासंगी व्यक्तीचं असे ग्रंथ लिहू शकेल. वयाच्या चौदाव्या- पंधराव्या वर्षात हे कसं शक्य आहे? त्यामुळं मुंतोजी खलजींचा जन्म शके १४३५ असला तरी मृत्यू शके १४५० नसावा, अशा निष्कर्षाप्रत आपण येतो.

'विवेकसिंधू' हा आद्य मराठी ग्रंथ आहे, असं मानतात. त्यांचा लेखनसमाप्तीकाळ 'शके अकरा शते दाहोत्तरू' म्हणजे शक १११० किंवा (स्थूल मानानं) बारावं शतक असा आहे. मध्ययुगीन मराठी संत साहित्यात एक योगायोग असा दिसतो की मराठीचा आद्य ग्रंथ भाष्यात्क / टीकात्मक /तत्त्वविवरणात्मक आहे तर आद्य मुसलमान मराठी संत कवीनं मुंतोजी खलजी यांनी देखील भाष्यात्मक /टीकात्मक रचना केली आहे. त्यांच्या ग्रंथांची हस्तलिखितं तंजावरची सरस्वती महाल लायब्ररी या मौलिक हस्तलिखित संग्रहात उपलब्ध होतात. (उदा. ज्योतिष विभाग, क्र.२५४२)

मुंतोजी खलजी हे बहमनी राजवटीतील संतकवी होते. त्यांच्या वडिलांचं नाव 'जीया दौलतखान' असं होतं, याचा उल्लेख त्यांच्या 'संगीत मकरंद' या ग्रंथाच्या समाप्तीत केलं आहे.

'श्रीमन्महाराजाधिराज श्रीसंगीतसहित सिरोमणि श्रीखलजिवंशवर्णन जीया दौलतखानाचा नंदन वजिरुल्मुल्क तेनकृता संगीत मकरंदश्चा टीका' मुंतोजी खलजी यांच्या गुरुंचं नावं महेन्द्राचार्य असं होतं. त्यांचा उल्लेख 'संगीत मकरंद' या ग्रंथाच्या समाप्तीत असा केला आहे. 'श्री सकळविद्याविशारद श्री मन्महेन्द्राचार्य चरणांबुज शिष्य.'

वजीरु मुल्क मुंतोजी खलजी यांच्या चरित्राविषयक माहितीवरून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढता येतात.

१. 'वजीरुल् मुल्क्' सारख्या महत्त्वाच्या पदावर असलेले इस्लामधर्मीय मुंतोजी खलजी हिन्दू धर्मातील 'सकळविद्याविशारद' महेन्द्राचार्य यांना गुरू मानतात आणि तेही बहमनीकाळात. तसेच महेन्द्राचार्य हे हिंदू आचार्य असूनही इस्लामधर्मीय मुंतोजी खलजी यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारतात व भारतीय विद्यांच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करतात. पंधराव्या शतकातील ही बाब सर्व धर्म समभावाची व राष्ट्रीय एकात्मतेची द्योतक नाही का?

२. भारतीय ज्योतिषशास्त्र व संगीत कला या विद्या मुंतोजी खलजींच्या काळापर्यंत महाराष्ट्रात इतक्या प्रगत झाल्या होत्या की त्यांचं केवळ अध्ययनच नाही तर त्यावर भाष्य लिहिण्याइतपत मुंतोजी खलजींसारखे इस्लामी सत्ताधारी यांना आत्मीयता वाटली, इतके ते मराठी मातीशी एकरूप झाले होते. त्यांचा व्यासंग करण्यात मुंतोजी खलजींसारख्या मुसलमान संतकवींच्या मार्गात कोणताही अडसर आला नाही, ही बाबही तत्कालीन महाराष्ट्रातील सामाजिक अभिसरणाची द्योतक आहे.

मुंतोजी खलजींच्या ज्योतिषशास्त्राविषयक भाष्यग्रंथाचं नाव 'विजय भैरव' असं असून त्यांच्या संगीत कलाविषयक टीकेचं नाव 'संगीत मकरंद' असं आहे. त्यांच्या 'विजय भैरव' या ग्रंथावरून मुंतोजींच्या काळात शुभ-अशुभ, मुहूर्त, प्रदोष, शकुन-अपशकुन ग्रहांचा मानव जीवनावरील प्रभाव इ. ची लोकमानसातील जी श्रद्धा होती तिचं दर्शन घडतं तर त्यांच्या 'संगीत मकरंद' या ग्रंथावरून तत्कालीन समाजात व भक्तिसाहित्यात संगीताविषयी विशेष अभिरुची होती, याचा प्रत्यय येतो.

आपल्या या पहिल्यावहिल्या ग्रंथ-निर्मितीमागील प्रेरणांचा उल्लेख मुंतोजी खलजींनी 'ज्ञानबोध' व 'अज्ञाननिरसन' या शब्दात केला आहे. ज्ञानप्राप्तीला धर्माच्या मर्यादा नसतात हे या आद्य मुसलमान मराठी संत कवीनं सूचित केलं नाही का ?
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही