नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


'संस्कृती' जपणारी आमरस-पुरणपोळी !

Go down

'संस्कृती' जपणारी आमरस-पुरणपोळी ! Empty 'संस्कृती' जपणारी आमरस-पुरणपोळी !

लिखाण  mansijoshi on Mon May 14, 2012 1:23 am

रंगीबेरंगी पताक्यांनी सजलेलं गाव , मंदिराभोवतीचा पार , छोटी-मोठी झाडं , गायींचे कळप ... लहानपणी सुट्यांमध्ये गावी गेल्यावर अनुभवलेलं हे वातावरण आता फक्त आठवणींच्या स्वरूपात उरलंय. पण त्र्यंबकरोडवरील ' हॉटेल संस्कृती ' त गेल्यावर गावाकडच्या आठवणी ताज्या होतात. या आठवणींसोबत तिथल्या गावरान महाराष्ट्रीय थाळीचा आस्वाद तर विचारूच नका. त्यातही खास उन्हाळ्यानिमित्त ठेवलेला आमरस , पुरणपोळीचा बेत तर ' सोने पे सुहागा ' आहे.

अक्षयतृतीयेनंतर सुरू होणारा आमरसाचा सीझन पावसाळ्यापर्यंत कायम राहतो. त्यातही आमरस आणि पुरणपोळी असं सुपर कॉम्बिनेशन असतं. पण वर्किंग वुमेन्सना पुरणपोळीसाठी आठवडाभर आधी प्लॅनिंग करावं लागतं. आदल्या दिवशी डाळ भिजत घालायची , दुसऱ्या दिवशी फेटणं यासाठी आईची किंवा सासुबाईंची मदत घ्यावीच लागते. त्यापेक्षा पुरणपोळीला फाटा देत फक्त आमरसावर भागवलं जातं. नेमकी हिच बाब लक्षात घेऊन संस्कृतीमध्ये अक्षयतृतीयेनंतर आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा (तीही खापरावरची) चा मेन्यू ठेवण्यात येतो. संस्कृतीतल्या महाराष्ट्रीय थाळीसोबत हा स्पेशल मेन्यू जेवणाची रंगत वाढवणारा आहे.

त्र्यंबककडे जाताना नाशिकपासून १२ किलोमीटरवर लागणारं हॉटेल संस्कृती आपल्या गावरानपणाबद्दल सर्वश्रृत आहे. फ्लॅट संस्कृतीतली मंडळी आपल्या मुलाबाळांना गावाकडची संस्कृती दाखवण्यासाठी इथला रस्ता पकडतात. इंग्रजी माध्यमामुळे ठावूक नसलेल्या अनेक बाबींची इथे माहिती मिळते. बारा बलुतेदारांची आठवण करून देणारे शिल्प , महाराष्ट्रातील महत्त्वाच्या किल्ल्यांची प्रतिकृती , विविध ऐतिहासिक वस्तू आताच्या पिढीला मार्गदर्शक तर आहेच , शिवाय ग्रामीण भागातील संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेलं पारावरचं मंदिर , कौलारू घर , मोट , विहीर , गायीचा गोठा , वेस हे सगळं पाहून गाव कसं असतं हेही कळतं. या सगळया बाबींसोबत इथली खाद्यसंस्कृतीही तितकीच लाजवाब आहे. महाराष्ट्रीय , पंजाबी , चायनीज , साऊथ इंडीयन या सगळ्या प्रकारचा मेन्यू इथे उपलब्ध आहे. या सर्वात स्पेशल म्हणजे महाराष्ट्रीय थाळी.

काळ्या मसाल्यातली भरली वांगी , सुकी भाजी , झुणका , चपाती , भाकरी , भात , वरण , जिलेबी , पापड , कुरडई , मिरचीची ठेचा अशा या हाऊसफुल्ल गावरान थाळीसोबत सध्या दिला जाणारा काळ्या मसाल्यातला सार (आमटी) , आंब्याचा रस व खान्देशी पुरणपोळीची (मांडे) ट्रिट दिलखुश करणारी आहे. इथला सगळा स्वयंपाक चुलीवर केला जात असल्याने थाळीतल्या प्रत्येक पदार्थाला गावरान टच आहे. अगदी भजी , कुरडई आणि जिलेबीसुद्धा. गावाकडच्या एसटी स्टँडवर मिळणारी खरपूस भजींची उणीव इथे भरून निघते. त्याचबरोबर एरवी पातळ कुरडई खाणाऱ्यांना फुगलेल्या कुरडईचा आनंद घेत येईल. एवढंच काय कुरकुरीत तळलेल्या नागलीच्या पापडातही गावरान टच आहे. रस्सेदार भरली वांगी आणि तव्यावर केलेला झुणका झटकेदार आहे. पण सध्याचं आकर्षण म्हणजे सार , मांडे आणि आंब्याचा रस.
खरपूस भाजलेला काळा मसाला , त्यात खोबरं , तेजपान , जिरे , मिरे अशा खड्या मसाल्याचं मिश्रण करून सार तयार केलं जातं. हे मिश्रण एकजीव होण्यासाठी यातील प्रत्येक घटकाचं प्रमाण अचूक पाळलं जातं. खमंग भाजल्यानंतर त्याची पेस्ट केली जाते. त्यात पाणी टाकण्यापूर्वी ते गरम करून घेतात. त्यामुळे त्याचा वेगळाच घमघमाट येतो. सारचा झटका अनुभवण्यासाठी जेवणाआधी चमचाने एक-दोन घोट आवर्जून प्या. गरमागरम सार गळ्यातून उतरताना नाक , डोळे , जीभ सगळ्यांध्येच भिनल्यासारखा वाटतो. मसालेदार साराच्या चवीत काळा मसाला हाच मुख्य घटक जाणवतो. शौकीन मंडळींना या साराच्या वाट्या फस्त करत अधिक मजा घेता येईल.

थाळीत ठेवलेली आमरस वाटी आणि मांडा बघूनच तोंडाला पाणी सुटतं. पिवळा धम्मक आंब्याचा रस आणि चार घड्यांचा मांडा थाळीचा केंद्रबिंदू आहे. रसासाठी पायरी आंबा वापरला जात असल्याने रसाला रंग येतो. दूध , पाणी आणि साखर टाकून तयार केलेला रस घट्ट आहे. इतर कुठलाही घटक त्यात टाकला जात नसल्याने आंब्याची नॅचरल टेस्ट कायम आहे. गहू व मैद्याच्या कणकात पुरण टाकून केला जाणारा मांडा रेशमी आहे. दोन्ही हातावर गोलाकार फिरवत केल्या जाणाऱ्या मांड्याला येणारा खापराचा दर्प खासच आहे. कदाचित हा फिल तुम्हाला इथेच येईल कारण मांडे बनविण्यासाठी खास खान्देशातून स्वयंपाकी बोलविण्यात आले आहेत. खापरावरची त्यांची ही कारागिरी मांडा खाताना लक्षात येते. गमतीशीर बाब म्हणजे मांड्याची चव लक्षात घेण्यासाठी फक्त मांडा खाल्ला तर कदाचित तुम्ही कन्फ्युज व्हाल पण हाच मांडा आमरसात बुडवून खाल तर चवीची रंगत लक्षात येते. म्हणूनच मांड्यासोबत आमरस का ठेवलाय याचं गुपित कळतं.

एकाहून एक सरस पदार्थांनी काठोकाठ भरलेली ही थाळी फक्त १३० रुपयांत आहे ती ही अनलिमिटेड. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला महाराष्ट्रीय जेवणाचा आनंद घेता यावा , यासाठी मुद्दामहून दर कमी ठेवल्याचे संस्कृतीचे संचालक दिग्विजय मानकर सांगतात. त्यात सुट्यांचा मौसम असल्याने आमरस आणि मांडे स्पेशल आहेत. विकेण्डला कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर संस्कृती बेस्ट ऑप्शन आहे. गावाकडचा जिवंत माहोल व कडाक्याच्या उन्हात थंडावा देणाऱ्या हिरवाईसोबत सध्या इथे गिनिज बुकात नोंदलं गेलेलं विलास करंदीकर यांचं ' आजीची भातुकली ' हे प्रदर्शनही भरलंय. या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊन भरगच्च थाळीवर ताव मारल्यावर मिळणारं समाधान शब्दांत सांगणे कठीणच !

- विक्रम जोर्वेकर
mansijoshi
mansijoshi
Newbie
Newbie

Posts : 10
Join date : 13/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही