नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


रायरंद

Go down

रायरंद      Empty रायरंद

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 1:03 am

रायरंद      5452_Rairand
महाराष्ट्रात बहुजन समाजातील अनेक भटक्या जमाती आहेत. त्यातली रायरंद ही मुलत: एक गुणी कलावंत जमात आहे. पावसाळा संपला की, ज्या प्रमाणे अनेक भटक्या जमातीचे लोक लोकानुरंजन करीत भिक्षा मागतात त्याच प्रमाणे रायरंद हे पूर्वास्पृश्य जमातीचे लोक गावोगावी जाऊन निरनिराळी सोंगे घेवून लोकांची करमणूक करतात.

पावसाळ्यानंतर रायरंद कुटुंबे एखाद्या गावात जाऊन गावाबाहेर तळ ठोकतात. परंपरेने ठरलेल्या आपल्या हक्काच्या गावाला ते वर्षातून एकदा जातात. रायरंद मुख्यत्वे गावातील सर्व जाती-जमातीच्या लोकांकडून भिक्षा मागत असले तरी स्वत:ला मागते समजतात. त्यातही आम्ही सोमवंशी महाराजांचे मागते आहेत असे ते सांगतात. सर्व पूर्वास्पृश्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आम्हीही बौद्ध झालो आहोत, असे रायरंद सांगतात. निरनिराळी सोंगे आणून करमणूक करणे हा रायरंदांचा पिढीजात धंदा आहे. केवळ वेशभूषा घेवून ते सोंगे वठवित नाहीत तर सोंगाला साजेसा अभिनय करुन आणि गाणी म्हणून लोकांची करमणूक करतात. सोंगे वठवण्याचे त्यांचे कौशल्य पाहता ते जातीवंत कलावंत आहेत, याची ओळख आपल्याला पटते कमीत कमी वेळामध्ये वेशांतर करुन लोकांना आश्चर्यचकीत करण्याचे कसब हे रायरंदाकडूनच शिकले पाहिजे. रायरंद जमात ही महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात रायरंद स्थायिक झाले आहेत. या रायरंदाची आडनावे - शिंदे, शेगर, जगताप, बाबर, जाधव हे असून विदर्भाच्या काही पट्ट्यात शेती व्यवसाय देखील ह्या जमाती करायला लागल्या आहेत. या समाजाचे उपजीविका भागविण्यासाठी सतत स्थलांतर होत असल्याने स्वत:च्या मालकीची मालमत्ता त्यांच्याकडे नाही. या समाजाने आपली स्वत:ची अशी रंगभूमी सुद्धा विकसित केलेली नाही. कारण रस्त्यावरच नाट्य दर्शनाचा पिढीजात व्यवसाय त्यांनी विकसित केलेला आहे.

आपल्यापथनाट्यात ते शंकर, नंदी, पार्वती, शामासिंगी, बाळंतीण इत्यादी पारंपरिक वेश सादर करतात. काळानुरुप त्यांच्या सादरीकरणात बदल होत चाललेला आहे. आजमितीला निरनिराळ्या खात्याचे सरकारी अधिकारी विशेषत: पोलीस अधिकार्‍यांची सोंगे हुबेहूब रंगवतात. त्यांचे संवाद उत्स्फूर्त असतात. त्याचप्रमाणे कथन आणि निवेदन स्वरूपाचेही असतात आणि प्रेक्षकांना समाविष्ट करुन घेण्याचे सुद्धा असतात. संवाद जरी मुक्त स्वरूपाचे असले तरी त्यांची गायनशैली ही वैशिष्ट्यपूर्ण असते. गायनाबरोबर वाद्य वाजवून खड्या आवाजात 'बोलो भिम भगवान की जय' अशी गर्जना करुन आपल्या कार्यक्रमाला सुरवात करतात. गाणं म्हटल्यानंतर एखाद्याने दान दिल्यास 'एकाचे एकतीस व्हावे, पाचाचे पन्नास व्हावे त्यांचा वेल मांडवावर जावा' असे आशीर्वाद देण्यास ते विसरत नाही. रायरंद बौद्ध धर्म स्विकारण्याच्या अगोदर 'हनुमान महाराज की जय' असा जयघोष करत, कुठे मुखवट्याचा वापर करतात तर कुठे तैल रंग वापरून देव-देवतांचे सोंग वठवतात. त्यांची पारंपरिक गाणी 'बाजीराव नाना तुंबडीभर दाना, मजेना खाना, साधु बरमें का ग्याना' तर बौद्ध धर्माबद्दल ते असे म्हणतात की, मेरे भिमजी ना होते तो कुछभी ना होता, ना तू यहाँ होता ना मै यहाँ होता.'

अशा प्रकारच्या कवनातून, मनोरंजनातून समाज प्रबोधन करत ही जमात आजही आपले अस्तित्व राखून आहे.

रायरंद दिवसभर सोंगं घेऊन गावात फिरतात. लोकांची करमणूक करतात. मिळेल ती बिदागी घेऊन संध्याकाळी घरी परततात. संध्याकाळी जिथे मुक्काम असेल तिथे त्या मोहोल्यामधून भाजी भाकरी गोळा करायची, रात्रीचं जेवण उरकायचे आणि मग रात्री साडेआठ -नऊ पासून अगदी पहाटेपर्यंत गाण्याचे कार्यक्रम करायचे व बक्षिसं मिळवायची असा एकंदर त्यांचा दिनक्रम असतो. गायक किंवा कलावंत मंडळी सकाळी आराम करतात. बाकी लोकं (पुरुष) वेष घेवून पुन्हा गावात जाऊन करमणूक करतात. पोलीसांचे ड्रेस घालून हे रायरंदाप्रमाणे फिरतात. डवरी गोसावी यांनाच दसनाम गोसावी असेही म्हटले जाते, या समाजाचा स्वतंत्रपंथ आहे. या पंथाची सुरुवात नवनाथांपैकी परबनाथापासून झाली. बहूजन समजातील अनेक जातींनी या पंथामध्ये प्रवेश केला आणि आपल्या चरितार्थाचे साधन निवडले. सर्व प्रकारचे हिंदू रिती-रिवाज ते पाळतात. विशेष म्हणजे होळी (धुळवड) हा महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी या समाजातील सर्व लोक एकत्र येतात व याच वेळी कुणाकडे काय घटना घडल्या याचे देवाण-घेवाण होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यांचे वास्तव्य आहे. सध्या अतिशय विखुरलेल्या अवस्थेत हा समाज आहे. अगदी गुजरात, पंजाबपर्यंत यांचे वास्तव्य आढळते.महाराष्ट्रामध्ये पुण्याकडे 'विदर्भातील भराडी' असे म्हणतात. तर उर्वरित महाराष्ट्रात हे रायरंद बहुरुपी म्हणूनही ओळखल्या जातो. डवरी गोसावी म्हणजे डवर हे दिंमडी सारखे (दिंमडी) वाद्य असते ते वाजवून हे भिक्षा मागतात. तर गोसावी बनून भिक्षा मागतात. महाराष्ट्रात साधारण १५ लाखाच्या आसपास या समाजाची लोकसंख्या आहे. डवरी गोसावी समाजाचा समावेश एन.टी.बी. ३ ई मध्ये करण्यात आला आहे. याच समाजाचे बोटावर मोजता येतील असे काही उच्चपदस्थ अधिकारी मुंबई-पुण्यात कार्यरत आहेत.

या समाजाची स्वतंत्र पंचायत आहे. या जातपंचायतीचे कायदे अतिशय कडक आहे. माधवराव पेशवांच्या काळात या समाजातील शिंदे यांना पाटीलकीचा मान मिळाला व त्यावेळेपासून समाजाचे पाटील म्हणून शिंदे घराण्याकडे ही परंपरा आली. म्हणूनच 'गोमेच्या पाया इतका शिंदे पुजावा' अशी आख्यायिका आली. या समाजामध्ये शिंदे, शेगर, जगताप, बाबर, चव्हाण अशी नावे आहे. रायरंदाचे राहणीमान साधारणपणे सामान्याप्रमाणेच. परंतू त्यांच्यातील कलावंत मंडळीचा नेहरू शर्ट किंवा झब्बा-पायजामा व लांब केस असा साधारण वेश असतो कारण कलावंत म्हणजे लांब केस व नेहरू शर्ट असेच राहावे लागते अशी ठाम कल्पना.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही