नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


नागझिरा वन्यजीव अभयारण्य

Go down

नागझिरा वन्यजीव अभयारण्य Empty नागझिरा वन्यजीव अभयारण्य

लिखाण  mansijoshi on Mon May 14, 2012 1:02 am

नागझिरा वन्यजीव अभयारण्याचे निर्सगाच्या कुशीत इंद्रधनुषी सौदर्यांने नटलेला स्वप्नातील भूप्रदेश असेच वर्णन करावे लागेल. येथील वन्यप्राणी व जैवीक विविधता चकीत करणारी आहे. लांबच लांब पसरलेले नवश्रीने नटलेले सुंदर जमीनीचे पट्टे.... निर्सगाच्या सौदर्याविष्काराचे मनोहारी रूप प्रतिबिंबीत करणारी नैसर्गिक तळे...चांदण्या रात्रीच्या निवांत शांततेत पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांना याची देही याची डोळा बघण्यातला थरार...

प्रातसमयी उगवतीची किरणे पडायला सुरूवात झाल्यावर पक्षांच्या मंजूळ सुरावटीने भारून गेलेले वातावरण.... अनुभवायचे ते नागझिर्‍यातच. नागझिर्‍यची जादू वर्षाकाठी 30,000 हजार पर्यटकांना साद घालते. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात 152 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नागझिरा परसले आहे.

नागझिरा 1970 साली अस्तित्वात आले. गोंदिया जिल्ह्यास मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या सीमा लागल्या आहेत. वैनगंगा नदीने येथील नैसर्गिक विविधतेत भर घातली आहे. नागझिर्‍याची भूमी विविध वन्यजीव व वनस्पतींनी समृद्ध आहे. अभयारण्यातून फिरताना छोट्या-मोठ्या पर्वतरांगा व विस्तीर्ण पसरलेली तळी दृष्टीस पडतात.

निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या उंच टेकड्या व हिरव्याकच्च वनराईत आढळणारी नै‍सगिर्क तळी मनास सुखावतात. नागझिर्‍यात कित्येक प्रकारच्या मासळ्या आढळतात. सस्तन प्राण्यांच्या 34 प्रजाती, पक्षांच्या 160, सरपटणार्‍या प्राण्यांच्या 30 हून अधिक अनं फुलपाखरांच्या 50 प्रजातीं येथे आढळतात. नागझिर्‍यातील जंगल सफर डोळ्याचे पारणे फेडण्यासोबतच विविधांगी अनुभव देते.

वाघ, बिबटे, चितळ, अस्वल, रानगवे, रानकुत्रे, निलगाय, खवल्या मांजर येथील प्राणीजीवन समृद्ध करते. वृक्षवल्लीही जैविक विविधतेत भर घालणारी. आवळा, कुसुम, सेमळ, तेंदु, जावळ, साग, बेहडा, उंबर यासारखी वृक्षे येथे आढळतात. नाग‍झिर्‍याहून जवळत 50 किलोमीटर अंतरावर नागझिर्‍यास भेट द्यायची झाल्यास उप-वनसंरक्षकास संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी म्हणजे वेळेवर तारांबळ उडणार नाही. या भागातील भूभागास दृष्टीलागण्याजोगे सौदर्य लाभले आहे.
नागझिर्‍याची सैर झाली की आपण नवेगाव राष्ट्रीय उद्यानासही

भेट देवू शकता. इटीयाडोहही येथून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आहे. अन हं, ट्रेकर्ससाठी अवघ्या 70 किलोमीटरवर प्रतागगढही आहे. दिवसभर जंगलसफारी आटोपल्यावर जंगलातील रात्रीच्या निवांत क्षणातील वन्यजीवांच्या हालचाली न्याहाळायच्या असतील तर मधुकुंज, लताकुंज ही विश्रामगृहेही आपल्या सेवेत आहेत. निसर्गयात्री मारूती चितमपल्ली यांनी येथील रानवाटा तूडवल्या आहेत. मनात हर्ष भरणार्‍या हिवाळ्याचे आगमन होतच आहे तर व्हा मग सज्ज आपणही तूडवायला नागझिर्‍याचा रानवाटा....


जाण्याचा मार्ग : नागझिर्‍यास आपण विमान, रेल्वे व रस्ता मार्गे पोहचू शकता. येथून नागपुर विमानतळ अवघ्या 120 किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन आहे गोंदिया. अंतर आहे फक्त 45 किलोमीटर. बसने जायचे झाल्यास साकोली (22 किलोमीटर) येथून गाड्यांची सेवा उपलब्ध आहे. भेट द्यायची उत्तम वेळ : ऑक्टोबर ते एप्रिल. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत.
mansijoshi
mansijoshi
Newbie
Newbie

Posts : 10
Join date : 13/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही