Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
फुलगोबीची खीर
:: विविधा :: खवय्यांच्या देशी :: शाकाहारी जिन्नस
पृष्ठ 1 - 1 पैकी • Share •
फुलगोबीची खीर

रविवारचा दिवस हा नवनवीन खाद्यपदार्थांच्या आस्वादांचा दिवस असतो. सहा दिवस ऑफिसमध्ये काम केल्यानंतर सातवा दिवस रिलॅक्स म्हणून किचनमधील नवनवीन प्रयोग करण्यात निघून जातो.
कॅलरिज, फॅट, डाएट, न्युट्रेशन अशा भल्या भल्या शब्दांच्या पाठीमागे रोज धावताना एखादा दिवस जरा हटके खाण्यापिण्याची सारी बंधने झुगारणारा असा असतो. नुकताच फियानच्या अवेळी पावसामुळे बाजारात भाजी काही प्रमाणात स्वस्त झाली होती. दहा रुपये पाव असलेली फुलगोबी अचानक पाच रुपयांने मिळाली. स्वस्त मिळतेयं म्हणून अधिक घेण्याचा हव्यास मोडता आला नाही. फुलगोबीची सुकी भाजी खाण्यापेक्षा वेगळं काही करता येईल का याचा विचार सुरू झाला. मुलीने दिलेल्या गोड खिरीच्या फर्माईशवर विचार करताना कुठल्यातरी पुस्तकात फुलगोबीची खिर वाचल्याचं आठवलं आणि प्रिपरेशन सुरू झालं. ही खिर पुढील प्रमाणे करता येईल.
साहित्य :- फुलगोबीचा किस, दूध एक लीटर, केवडा इसेंन्स, साखर दोन वाट्या, काजू, वेलची पावडर
कृती :- प्रथम दूध उकळवायला ठेवावे, दूधाला उकळी येत असताना त्यात फुलगोबीचा किस टाकावा. हे दूध जवळजवळ अर्धे आटल्यावर त्यात साखर घालून पुन्हा आटवून घ्यावे. हे सर्व मिश्रण अर्धअधिक आटवून झाल्यानंतर थंड होण्यासाठी खाली उतरवून ठेवावे. थंड झाल्यावर त्यात वेलची, काजूचे तुकडे आणि केवडा इसेंन्सचे ५ थेंब टाकावेत. थंड झाल्यावर ही खीर सर्व्ह करावी.
खिरीचे अनेक प्रकार आहेत. माझी आजी तांदळाची खिर उत्तम करायची. इतर पदार्थांपेक्षाही ही खिर खाण्यात खूप मजा यायची. आजही काही हॉटेल्स असे आहेत की, ती खिरीसाठी प्रसिद्ध आहेत. चांदवड घाट ओलांडल्यानंतर मालेगावकडे जाताना डाव्या हाताला एक छोटासा ढाबा आहे. या ढाब्यावर उत्तम प्रतिची खिर मिळते. गमंत म्हणजे रात्री बेरात्री कितीही वाजता गेल्यानंतर गरम खिर मिळते. पारोळ्याला एसटी स्टँडच्या जवळच एक भोजनालय आहे. तेथेही खिर आवर्जून खाणार्यांची संख्या मुंबई -नागपूर महामार्गावर खूप मोठी आहे. अर्थात तेथे जाऊन खाण्यापेक्षा आज दिलेली खिर कधीतरी करून बघायला हरकत नाही.
:: विविधा :: खवय्यांच्या देशी :: शाकाहारी जिन्नस
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
» ई विश्व आणि टपालखाते
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा