नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


किल्ले चावंडगड

Go down

किल्ले चावंडगड      Empty किल्ले चावंडगड

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:09 am

किल्ले चावंडगड      6470_Mahasan_L

जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे. या तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे.

कुकडीनदीवर माणिकडोहचे धरण झाल्यामुळे धरणाचे पाणी चावंडगडच्या उत्तरअंगाला येवून भिडले आहे. जुन्नर, आपटाळे, घाटघर, अजनावळे असा गाडीमार्ग आहे. या गाडीमार्गावर एस.टी. बसेसची सोय आहे. जुन्नरपासून बारा तेरा कि.मी. अंतरावर चावंडचा किल्ला असून तो आपटाळ्या पासून ४ कि.मी. वर आहे. या गाडीमार्गावर चावंडवाडीकडे जाणारा एक लहानसा फाटा आहे. या फाट्यापासून कि.मी. भर अंतरावर चावंडवाडी हे लहानसे गाव किल्ल्याच्या पायथ्याला वसलेले आहे. या गावातूनच गडावर जाणारा मार्ग आहे.

चावंडवाडीतून छातीवरच्या चढानेच आपण चढून आपण चावंडच्या कातळमाथ्याला भिडतो. या कातळातून पूर्वी पायर्‍यांचा मार्ग होता. इंग्रजांनी किल्ल्याच्या माथ्यावर जाणार्‍या या पायर्‍या तोडून हा मार्ग उध्वस्त केला. या कातळकड्याला वनखात्याने लोखंडी शिडी लावून ही चढाई काही प्रमाणात सुकर केली आहे. येथून पुढे आल्यावर कातळात कोरुन काढलेला पण लपवलेला दरवाजा आहे. अशा रचनेला गोमुखी पद्धतीने उभारलेला दरवाजा म्हणण्याचा प्रघात आहे. दरवाजावर गणेशपट्टी आहे. या प्रवेशमार्गाने आपण किल्ल्यामध्ये दाखल होतो.

किल्ल्याच्या मधल्या उंचवट्यावर गडाची देवी चावंडाई मातेचे लहानसे मंदिर आहे. आत सुबक मूर्ती आहे. या उंचवट्याच्या उत्तरेकडील उताराखाली पाण्याची टाकी आहेत. हा कातळात कोरलेला असा एक टाक्याचा समूह आहे. तो मधल्या कातळभिंतींमुळे वेगवेगळा झालेला दिसतो. या टाक्यामधील पाण्याचा वापर सध्या होत नाही त्यामुळे हे पाणी काही प्रमाणात शेवाळलेले असते. या सगळ्या टाक्या कमी जास्त प्रमाणात शेवाळल्या असल्यामुळे या पाण्यावर पिवळसर हिरवट झाक असते. मात्र प्रत्येक टाक्यामधील ही झाक वेगळी दिसते. हे दृश्य एप्रिल - मे मध्ये पावसाळ्याच्या सुरवातीला दिसू शकते. या बद्दल एक दंतकथाही इथे ऐकायला मिळते. प्रभू रामचंद्र आणि सीता वनवासात असताना सीतामाईने या वेगवेगळ्या टाक्यातील पाण्याने आंघोळ केली म्हणून याचे रंग वेगवेगळे दिसतात. असो.

चावंड गडावर मंदिर, पाण्याच्या टाक्या, कमान उत्तर कड्यावरील गुहा, घरांची तसेच वाड्याचे जोते असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. शहाजी राजांच्या जहागिरीमधील चावंडगड पुढे मोगल राजवटीमध्ये गेला. १८१८ साली महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांबरोबरच चावंडचा ताबाही इंग्रजांना मिळाला. लष्करी वापराच्या दृष्टीने याचा वापर करता येवू नये अशा पद्धतीने इंग्रजांनी इतर किल्ल्यांप्रमाणे चावंडगडही उध्वस्त केला.

चावंडगडावरुन माणिकडोह धरणाचा जलाशय सुरेख दिसतो. शिवनेरी, हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड असे किल्लेही माथ्यावरुन पहाता येतात. चावंडगडापासून जवळच ४ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वराचे मंदिरही निसर्गरम्य आहे तेही या भटकंतीमधे पहाता येईल.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही