नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


स्वामी स्वरूपानंद

Go down

स्वामी स्वरूपानंद Empty स्वामी स्वरूपानंद

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 11:20 pm

स्वामी स्वरूपानंद 7103_MahaS

आधुनिक काळातील संतांमध्ये स्वामी स्वरूपानंद हे एक अग्रणी संत आहेत. त्यांचा रत्नागिरीजवळील पावस येथील आश्रम विख्यात असून स्वामी देशाच्या स्वातंत्र्यदिनी निजधामी गेल्यावरही इतकी वर्ष राष्ट्रसंत तुकडोजींच्या गुरुकुंज आश्रम व त्याच्या विविध शाखांप्रमाणेच स्वरूपानंदांचं आध्यात्मिक कार्य त्यांचे शिष्य अत्यंत निष्ठेनं करीत आहे.

स्वामींचा जन्म शके १८२५ (म्हणजे इ.स.१९०३) चा, म्हणजे त्यांना लौकिक जीवनाची अवघी चार साडेचार दशकंच मिळाली पण एवढ्या अल्प आयुष्याचा प्रत्येक क्षण, संसारात न गुंतता, त्यांनी परमार्थ साधना व परमार्थ प्रसारासाठी वेचला. त्यांचं शिक्षण रत्नागिरी, पुणे नि मुंबईला झालं. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय विचारसरणीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.

त्यांनी 'स्वावलंबनाश्रम' नामक शिक्षण संस्थाही चालविली. त्यांच्या आध्यात्मिक विचारांवर ज्ञानदेव नि समर्थ रामदासस्वामी यांचा विशेष प्रभाव होता. त्यांनी ज्ञानदेवांच्या काही ग्रंथांविषयी भाष्यात्मक लेखनही केलं. स्वामींचा शिष्य-प्रशिष्य परिवारही बराच मोठा आहे.

त्यांच्या स्फुट लेखनात-अभंगस्वरुप लेखनात त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत साधना कशी करावी, दैनंदिन जीवन कसं व्यतीत करावं, क्लिष्ट कर्मकांडाऐवजी सुगम भक्ती कशी करावी इथपासून जीवन्मुक्ताच्या स्थितीचं विवरणही अत्यंत नेमकेपणानं केलं आहे. संतसंग व संतमहिमा यांचं प्रतिपादनही त्यांना लेखनात आढळतं. त्यांच्या शैलीत समर्थ रामदासांच्या शैलीचं प्रतिबिंब उमटल्याचं मला जाणवतं. त्यातही त्यांनी आपल्या शब्दवैभव ओतल्याचीही प्रचीती येते. उदा. मी संसाराच्या व्यापात न पडता आत्मरुपाच्या शोधात का निघालो, हे सांगताना स्वामी म्हणतात,

निर्भय, निश्चिंत, निवांत, निरार्त रतलेंसे चित्त हरिपायीं
सांडिला संसार व्हावया उद्धार केली सारासार विचारणा
हरि-कृपाबळें लाधला सत्संग सांपडला मार्ग स्वानंदाचा
स्वामी म्हणे मज आकळलें गुज देखिलें सहज आत्म-रुप


यातील पहिल्या दोन चरणांतील चार विशेषणंच विरक्त वृत्तीचं किती नेमकेपणानं चित्र रेखाटतात ! खूप वेळा स्वरूपानंदांचं लेखन वाचताना त्यांच्या शब्दकलेचा नि त्यांच्या प्रतिमा सृष्टीचा स्वतंत्र विचार करायला हवं, असं मला वाटतं. त्यावर कुणाचाही प्रभाव नसून त्यात स्वामींचे व्यवच्छेदक व्यक्तित्व नि कवित्व प्रकटतं.

परमेश्वराशी हृदयसंवाद करताना स्वामींनी एकाच रचनेत सागर-लहर, सुवर्ण-अलंकार, चंद्रमा-चंद्रिका, दीप-प्रकाश अशा कितीतरी प्रतिमांची कोंदाकोंदी करुन देव आणि भक्त यांच्यामधील अभिन्नत्व व अद्वैत विशद केलं आहे. हे मला खूप भावलं आहे -

देवा, तूं सागर मी तुझी लहरी दोघांसी अंतरी भेद नाहीं
देवा तूं सुवर्ण मी तुझें भूषण दोघां एकपण ठाई चें चि
देवा, तूं चंद्रमा मी तुझी चंद्रिका आम्हा एकमेकां अभिन्नत्व
देवा तूं प्रदीप मी तुझा प्रकाश नांदू सावकाश स्वामी म्हणे


पुढील रचनेत स्वामींनी अशी साक्षात्काराची अनुभूती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, जी खरं तर केवळ 'रचसंवेद्य'च असू शकते-

एकचि हरि-रूप सर्वत्र संचलें व्यापुनी राहिलें त्रैलोक्यासी
एक हरिविण दुजें नाहीं कांही जीव-जगत पाहीं मायाजन्य
मिथ्या माया जाण मिथ्या नाम-रूपें एकला स्वरूपें हरि नांदे
व्याप्य ना व्याप्कां वाच्य ना वाचक एक तें नि:शंक स्वामी म्हणे


साक्षात्कारानंतरही जो जनकल्याणासाठी जगतो, त्या 'जीवन्मुक्ता'ची अवस्था वर्णन करणं, हेही असंच अवघड आहे पण, स्वरूपानंदांनी तीही समर्थपणे वर्णिली आहे. हा जीवन्मुक्त अर्थातच प्रज्ञावंत असतो -

दु:खाचा डोंगर आदळो कां शिरीं जयासी अंतरीं खेद नाहीं
प्राप्त झाली सिद्धि पावला समृद्धि तरी आत्म-बुद्धी भंग नाहीं
नेणे निंदा-स्तुति नेणे भव-भ्रांति राहे -आत्म स्थिति अखंडित
नित्य आत्म-तृप्त निर्भय निश्चिंत तो चि प्रज्ञावंत स्वामी म्हणे


प्रापंचिकाची मानसिकता कशी असावी व जीवनादर्श कोणते असावेत, त्याचप्रमाणं त्याच्या दैनंदिन जीवनात काय असावं नि काय नसावं, याचा तपशीलवार विचार स्वरूपानंद समर्थाप्रमाणंच करतात. ह्या दोन रचनाही पुढं उद्धृत करतो.

नको निराहार नको सेवूं फार सदा मिताहार असों द्यावा
नको अति झोंप नको जागरण असावें प्रमाण निद्रेमाजीं
नको बोलू फार नको धरुं मौन करावें भाषण परिमित
संयमी जीवन बाणतां सहज 'स्वामी म्हणे तुज योग-सिद्धि

संतांची संगति घडो सर्वकाळ आवडो गोपाळ अंतर्यामीं
काम क्रोध-लोभ निमोत आघवे रमो चित्त भावें हरिपायीं
जळो तो मत्सर गळो मोह-मद लागो मना छंद गोविंदाचा
विषयांची गोडी न वाटो जीवास लागो हरि-ध्यास स्वामी म्हणे


डॉ.यू.म.पठाण
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही