नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


आठवणीतल्या कविता

Go down

आठवणीतल्या कविता Empty आठवणीतल्या कविता

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 11:19 pm

वर्ष संपत असताना कायम मनाला हुरहूर लागून राहते आणि सरत्या वर्षात आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा लेखाजोखा मनात उभा राहू लागतो. ही हुरहूर जुन्या आठवणींना उजाळा देणारी असते आणि त्या आठवणी एका वर्षातल्या थोड्याच असतात... बघता बघता आठवणींचा हा फेर शेवटी आपल्याला आपल्या बालपणातच घेऊन जातो. हा सगळा शेवटी 'नॉस्टाल्जिया'चा खेळ असतो. अशाच खेळाच्या मोहात पडलेल्या चार माणसांना एकाएकी बालपणी शिकलेल्या आणि पुढे तुकड्या तुकड्यांनी स्मरणात राहिलेल्या कविता आठवू लागतात आणि त्या कवितांचे मग त्यांना पिसेच जडून जाते!

'उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले,
डोळे तरी मिटलेले अजूनही...'

ही शालेय जीवनातील कविता त्या चारचौघांपैकी सर्वांनाच मुखोद्गत असते. पण 'आजीच्या घरचे घड्याळ कसले आहे चमत्कारिक...' ही कविता संपूर्णपणे पाठ असणारे शोधूनही सापडत नाहीत. यातूनच त्या चौघांना जुन्या कवितांचा धांडोळा घेण्याचा छंद जडतो. अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या कुणा आजोबाला आपल्या नातवाला नेमक्या त्याच काळात 'पडुं आजारी, मौज हीच वाटे भारी...' ही कविता हवी असते आणि योगायोगानं तो याच चौघांपैकी एकाकडे त्या कवितेसाठी संपर्क साधतो. त्यातूनच अशाच अनेक कवितांचा शोध सुरू होतो. या चौघांमध्ये एक जण दिवसभर पैशाच्या व्यवहारात गुंतून पडलेले, तरी कवितांवर प्रेम करणारे स्टेट बँकेतील अधिकारी पद्माकर महाजन असतात, तर दुसरे कायम पुस्तकांच्या विश्वात दडून राहणारे कीर्ती महाविद्यालयाचे गंथपाल दिनकर बरवे असतात. त्याच कॉलेजातील (आता दिवंगत) प्रा. रमेश तेंडुलकर हे तर स्वतŠच लेखक आणि उत्तम कवीही. हे तिघेही साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांना साथीला घेतात आणि त्यातून अशा असंख्य कविता जमा होतात.

कीर्ती कॉलेजमधीलच एक व्यासंगी प्राध्यापक एकनाथ साखळकर मग या कवितांची निगराणी करण्याचं काम हातात घेतात आणि त्यातूनच 'आठवणीतल्या कविता' अशी ग्रंथमालिकाच साकार होते. या जुन्या कविता कोण विकत घेणार, असा प्रश्न त्यातल्याच काहींना पडतोही. पण साखळकर माघार घ्यायला तयार नसतात आणि बघता बघता या मालिकेसाठी तुफानी बुकिंग सुरू होते आणि आपल्या कामाला यश आल्याची भावना या सर्वांच्या मनात दाटून येते.

आज या घटनेला बरोब्बर दोन दशकं लोटली आहेत. तरीही या कामाचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. त्याचं एक कारण या कवितांच्या अवीट गोडीत जसं आहे, त्याचबरोबर या सर्वांनी या कविता जमा करण्यासाठी घेतलेल्या अपरंपार मेहनतीतही आहे.

या खंडातील कोणताही एक हातात घेऊन, मधूनच उघडला तरी आठवणींचा खजिनाच हाती येत राहतो. कधी ' या बाइ या, बघा बघा कशि माझि बसलि बया' ही 'शहाणी बाहुली' नावाची दत्त कवींची कविता सामोरी येते, तर कधी वा. भा. पाठक यांची
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढें, चिंधड्या -उडविन राइ राइ एवढ्या

या ओळी नजरेसमोर येतात आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे जिवाला जीव देणारे सवंगडी दिसू लागतात. कधी बी कवींची 'गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या? कां गंगायमुनाहि या मिळाल्या' अशा हृदयाला हात घालणार्‍या ओळींनी सुरू होणारी 'माझी कन्या' ही कविता भेटीला येते. तर मध्येच
आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी
ती हाक येई कानीं मज होय शोककारी

या कवी यशवंतांच्या पंक्ती डोळ्यांत पाणी आणतात.
पहिल्याच खंडातली पहिली कविता ही सर्वांच्याच ओळखीची असते आणि 'थोर तुझे उपकार।। आई थोर तुझे उपकार।।' या ओळी तर सर्वांनाच ठाऊक असतात. पण या अजरामर कवितेचे कवी भास्कर दामोदर पाळंदे आहेत, हेही आपल्याला माहीत होऊन जाते आणि या कवीला वंदन करावेसे वाटते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे 'बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गीत येथे अचानक सामोरे येते, तर कधी
अजुनि चालतोचिं वाट! माळ हा सरेना!
विश्रांतिस्थळ केंव्हां यायचें ते कळेना!

या ए. पां. रेंदाळकर यांच्या ओळी अवघ्या जीवनाचा अर्थ उलगडून दाखवू लागतात.
भूतकाळातल्या अनेक स्मृती जागवण्याचं काम तर या कविता करतातच पण त्याचबरोबर त्या घटनांचा नव्यानं अर्थ लावण्याचं कामही या कविता करत जातात. त्यामुळेच तर या कविता आणि त्यांचे ‘आठवणीतल्या कविता’ हे खंड यांचं मोल खर्‍या अर्थानं अनमोल आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही