नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


तळबीडचा वसंतगड

Go down

तळबीडचा वसंतगड Empty तळबीडचा वसंतगड

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:48 pm

तळबीडचा वसंतगड 7749_MahaS

पुणे बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यामधून जातो. या महामार्गावर सातारा उंब्रज कर्‍हाड अशी गावे आहेत. यात उंब्रज आणि कर्‍हाड यांच्या मधे पश्चिमेकडे इतिहास प्रसिद्ध तळबीड हे गाव आहे. तळबीड गाव वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

या महामार्गावर तळबीड फाट्याला उतरुन तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कर्‍हाडवरुन एस. टी. बसेस ची सोय आहे. गाडीमार्गाने तळबीडला पोहोचल्यावर गावाच्या सुरवातीलाच आपल्याला दर्शन होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांच्या स्मारकाचे.

गेली अनेक वर्षे हंबिरराव मोहीते यांचे स्मारक उपेक्षीत राहीले होते. पण आता गावकर्‍यांनी या स्मारकाची नव्याने उभारणी करुन त्या स्मारकाला न्याय दिला आहे. हंबिरराव मोहीते आणि ताराराणी यांच्या पराक्रमाने तळबीड हे गाव प्रसिद्धीस पावले.

हंबिरराव आणि ताराराणी यांच्या पराक्रमांच्या यशोगाथा सांगतच आणि सैनिकी पेशाचा सार्थ अभिमान बाळगत गेल्या अनेक पिढ्यांनी राष्ट्राची सेवा करण्याची कामगिरी पार पाडली आहे.

से. हंबिरराव यांच्या स्मारकाजवळ नतमस्तक होवून आपण स्मारकामागिल मंदिराजवळ येतो. या मंदिराचा कायापालट झाल्यामुळे त्यालाही देखणे रुप आले आहे. हा परिसर पाहून आपण गावापलिकडील शाळेजवळ पोहोचतो. शाळेजवळच एक विश्रामगृह गावकर्‍यांनी उभारलेले आहे. या विश्रामगृहाच्या मागील बाजूलाच गडावर जाणारा मार्ग आहे. या मार्गावर गावकर्‍यांनी पायर्‍या बांधल्या आहेत.

या पायर्‍यांच्या मार्गाने आपण ३५ ते ४० मिनिटांमध्ये गडाच्या माथ्यावर पोहोचतो. गडाचा इकडील दरवाजा इंग्रजांच्या तोफांच्या हल्ल्यात नष्ट झाल्यामुळे त्याचे अवशेष शिल्लक आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर एक घुमटीवजा मंदिरामधे गणपती आहे. गणपतीची तीन फुटांची ही मुर्ती देखणी आहे. खडकात खोदलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने आपण गडाच्या माथ्याकडे निघतो. वर चंद्रसेन महाराजांचे मंदिर आहे.

वसंतगडावर चारही बाजुला असलेल्या तटबंदीमधे चार देखणे बुरुज असून त्यावर चढण्यासाठी पायर्‍या केलेल्या दिसतात. गडावर वाड्यांचे अवशेष, तळी, घरांची जोती, जुन्या समाध्या व सतीशिळा पहायला मिळतात. गडाच्या पश्चिमेकडे असलेल्या दरवाजाला नाईकबा दरवाजा असे नाव आहे. संपुर्ण गडफेरी करायला दिड दोन तासांचा अवधी पुरेसा होतो.

अफझलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी केलेल्या चढाईत वसंतगड स्वराज्यात दाखल करण्यात आला. जिंजीमधून राजाराम महाराज निसटल्यानंतर महाराष्ट्रामधे आले असता काही काळ वसंतगडावर त्यांचा मुक्काम होता. औरंगजेबाच्या ताब्यात वसंतगड आल्यावर त्याने वसंतगड हे नाव बदलून किली-द-फतह असे केले होते. पुढे मराठ्यांनी पुन्हा वसंतगडाचा ताबा मिळवला.

वसंतगड आणि तळबीडचा परिसर हा सर सेनापती हंबिरराव मोहीते आणि महाराणी ताराराणी यांच्या पराक्रमांचा साक्षीदार आहे. वसंतगडाची भ्रमंती निश्चितच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही