नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


लक्ष्मणरेषा - आर. के. लक्ष्मण (अनुवाद - अशोक जैन)

Go down

लक्ष्मणरेषा - आर. के. लक्ष्मण (अनुवाद - अशोक जैन) Empty लक्ष्मणरेषा - आर. के. लक्ष्मण (अनुवाद - अशोक जैन)

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:47 pm

लक्ष्मणरेषा - आर. के. लक्ष्मण (अनुवाद - अशोक जैन) 7801_Mahasan_L

आर. के लक्ष्मण हे गेली पाच दशके जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणून ख्यातनाम आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ सारख्या वृत्तपत्रातून या काळात त्यांची राजकीय व्यंगचित्रे दररोज प्रसिद्ध होत आहेत. ‘यू सेड इट’ या शीर्षकाखाली ‘टाइम्स’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होणारं त्यांचं व्यंगचित्र बघितल्याशिवाय, या देशातील लक्षावधी सुज्ञ वाचकांचा दिवस सुरूही होत नाही. पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लक्ष्मण यांची व्यंगचित्रे ‘कसं बोललात!’ या नावानं प्रसिद्ध व्हायला लागली आणि अल्पावधीतच मराठी वाचकांमध्येही लक्ष्मण यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.

एखादी राजकीय घटना घडून गेल्यावर त्यातील व्यंग नेमकं टिपून ते कागदावर रोजच्या रोज चितारणं, ही सामान्य गोष्ट नाही. त्यासाठी राजकारणाचा अभ्यास तर अत्यावश्यक आहेच शिवाय त्याचवेळी त्याच घटनेतील विसंगती शोधून काढण्याचं कामही तितकंच कठीण आहे. शिवाय, ती विसंगती लक्षात आली, तरी वृत्तपत्राची डेडलाईन सांभाळून आणि शिवाय भारतासारख्या देशात राजकारण्यांचा मोठ्या प्रमाणावर अवमान होणार नाही, अशा पद्धतीने ती कागदावर उतरवण्याची कला ही अदभूतच म्हणावी लागेल. लक्ष्मण यांनी हे काम केले आणि त्यामुळेच ते आज जागतिक स्तरावरील एक प्रख्यात व्यंगचित्रकार म्हणून ओळखले गेले.

लक्ष्मण यांना हे सारं जमू शकलं, त्याचं प्रमुख कारण म्हणजे लहानपणापासूनच त्यांची नजर ही सुसंगतीपेक्षा विसंगती शोधण्याकडे अधिक होती आणि मुख्य म्हणजे आपण जे काही बघितलं आहे, ते मिश्किल आणि खुसखुशीत पद्धतीनं सांगण्याची कलाही त्यांना जन्मजातच अवगत होती. शिवाय, लेखनकलाही लक्ष्मण यांच्या घरातच पाणी भरत होती. प्रख्यात लेखक आणि कादंबरीकार आर. के. नारायण हे लक्ष्मण यांचे बंधू. त्यांच्या कथांसाठी समर्पक अशी रेखाटनं करण्याचं कामही लक्ष्मण हेच करत आले होते. त्यामुळेच बहुधा आपल्या जीवनाची कहाणी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवावी, अशी भावना लक्ष्मण यांच्या मनात निर्माण झाली असणार. हातातल्या कुंचल्याबरोबरच ते लेखणीही किती सहजगत्या आणि किती कौशल्यानं चालवू शकतात, याचंच प्रत्यंतर त्यांच्या ‘द टनेल ऑफ टाइम’ या आत्मवृत्तातून त्यांनी आणून दिलं आहे. अर्थात, हे लक्ष्मण यांचं काही पहिलं पुस्तक नाही. त्यांनी अनेक लघुनिबंध, प्रवासवर्णनं आणि निबंधही लिहिलेले आहेत आणि ते रसिकांच्या पसंतीसही उतरले आहेत. त्यामुळेच सुमारे एक तपापूर्वी लक्ष्मण यांचं हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं तेव्हा त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या.

प्रख्यात पत्रकार आणि ज्येष्ठ अनुवादक अशोक जैन यांनी लक्ष्मण यांच्या या पुस्तकाचा तेव्हाच तातडीनं अनुवाद केला आणि तो ‘लक्ष्मणरेषा’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे मराठीत एका उत्तम अनुवादित पुस्तकाची भर पडली आहे, एवढेच म्हणून चालणार नाही. कोणत्याही कलावंताच्या खाजगी जीवनाबद्दल लोकांना कमालीचं कुतुहल असतं. ते कुतुहल या पुस्तकानं पूर्ण तर केल आहेच शिवाय त्यातून गेल्या ५० वर्षांतील भारतातील तसेच परदेशातील राजकारणी, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांच्या आवडीनिवडी, वृत्तपत्रांतून त्यांच्यावर रोजच्या रोज केल्या जाणार्‍या टीका-टिपणीबद्दलची त्यांची प्रतिक्रिया याबाबतची माहितीही वाचकांना त्यातून मिळत जाते आणि त्या काळाचा एक तिरकस वेधही नजरेसमोर येत जातो. त्यामुळेच आज हे पुस्तक उपलब्ध होऊन १२ वर्षे उलटली असली, तरी ते तिकंच वाचनीय ठरतं.

या पुस्तकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या जशा मनोज्ञ आठवणी आहेत, त्याचबरोबर आपल्या इंग्लंडमधल्या काही महिन्यांच्या वास्तव्यात तेथे भेटलेले राजकारणी आणि साहित्यिक यांचेही किस्से लक्ष्मण यांनी मोठ्या रंगतदार पद्धतीनं आपल्यापुढे साकार केले आहेत. लक्ष्मण यांचं चतुरस्त्र वाचन जसं त्यातून आपल्यापुढे उभं राहत जातं, त्याचबरोबर त्यांची रसिक आणि आपल्या सभोवताली जे काही घडतंय, त्याच्यात सर्वांशानं रस घेण्याची वृत्तीही. त्यामुळेच सर्वांनी आवर्जून वाचावं, असं हे पुस्तक आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही