नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


किल्ले कांचनगड

Go down

किल्ले कांचनगड

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:45 pm


नाशिक जिल्ह्यात दुर्गांची संख्या मोठी आहे. हे दुर्ग गिरीदुर्ग प्रकारात मोडणारे असल्यामुळे बेलाग आहेत. यातील अनेक दुर्ग एकेका डोंगर रांगेमध्ये असल्यामुळे दुर्गांची साखळीच तयार झाली आहे. नाशिक शहराच्या उत्तरेकडे भौगोलिकदृष्टया अतिशय महत्त्वाची अशी अजंठा-सातमाळा ही डोंगररांग आहे. या डोंगर रांगेची सुरवात अचला नावाच्या किल्ल्यापासून होते. या पूर्व-पश्चिम पसरलेल्या रांगेत अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत.

याच रांगेत माथ्यावर तुरा शोभावा असा सुळका घेवून उभा आहे, तो कांचनगड अथवा कंचना किल्ला. नाशिक-सटाणे मार्ग या सातमाळा रांगेला छेदून जातो. येथे लहानसा घाट रस्ता आहे. या घाटाच्या पश्चिम अंगाला कांचनगड आहे. या घाटाजवळ खेळदरी नावाचे लहानसे खेडे आहे. खेळदरी हे खेडे भाऊ खिंडीच्या दक्षिण पायथ्याशी आहे. नाशिक वडाळाभोई सटाणे अशी एस.टी.ची सेवा आहे. या एस. टी. मार्गाने अथवा चांदवड या तालुक्याच्या गावाकडूनही गाडीमार्गाने खेळदरीपर्यंत पोहोचता येते.

खेळदरीपासून चालत अर्ध्या पाऊण तासात आपण कांचनच्या पायथ्याला पोहोचू शकतो. पायथ्यापासून मळलेल्या वाटेने कांचन मंचनच्या मधील खिंडीत पोहोचेपर्यंत तासभर लागतो. खिंडीच्या उजव्या बाजूच्या गुहेमध्ये पाण्याची टाकी कोरलेली आहेत. खडकांमध्ये कोरलेल्या या टाक्यामधील पाणी थंडगार असून पिण्यायोग्य आहे. या गुहेमधून मंचनचे दृष्यही उत्तम दिसते. खिंडीतून काहीश्या घसार्‍यावरुन कसरत करीत आपण कांचनगडाच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर गडपणाच्या काहीश्या खाणाखुणा सोडल्या तर उभी असलेली एकही वास्तू नाही. पाण्याच्या तीन टाक्या आहेत. माथ्यावरचा सुळका चढण्यासाठी सोबत आवश्यक असे गिर्यारोहणाचे साहित्य पाहीजे.

कांचनावरुन पूर्वेकडे कोळदेहेर, राजदेहेर इंद्राई हे किल्ले तसेच साडेतीन रोडगा नावाच्या सुळक्याचे दर्शन उत्तम होते. तर पश्चिमेकडे विखार्‍याचा सुळका लक्ष वेधून घेतो. त्याच बरोबर सातमाळा रांगेतील धोडप, खळा-जवळा, सप्तश्रृंगी, अहिवंत हे किल्ले दिसतात. स्वच्छ हवामानात उत्तरेकडे साल्हेर सालोटा, मुल्हेर, चौल्हेर तसेच कर्‍हेगडापर्यंत डोंगररांग दिसते.

कांचनवरुन पुन्हा खिंडीत येवून आपण मंचनावर चढतो. गडाच्या या भागात मात्र आपल्याला अनेक अवशेष व पाण्याची टाकी पहायला मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची संपत्ती लुटल्यानंतर याच मार्गाने परत फिरत असताना मोगली सरदार दाऊदखान आडवा आला होता. या दाऊद खानाला कांचन किल्ल्याच्या जवळ असणार्‍या भाऊड खिंडीजवळ गाठून महाराजांनी त्याचा सपाटून पराभव केला होता. या पराक्रमाची स्मृती जागवीतच आपण कांचनचा किल्ला उतरतो. पायथ्यापासून धोडप गडाकडे जाता येते अथवा खेळदरीकडे येवून परतीच्या वाटेला लागता येते.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही