नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


चवदार हिरवी कढी

Go down

चवदार हिरवी कढी

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:34 pm


दिल्लीतली हिरवळ... टेबलावर विविध प्रकारचे पंजाबी आणि महाराष्ट्रीयन प्रकारचे खाद्यपदार्थ रचून ठेवले होते. एकदाच सूप संपलं आणि जेवणाच्या दिशेने सार्‍यांची लगबग सुरु झाली. हातात भलीमोठी डीश सांभाळण्याची कसरत करतं एक कोपरा पकडला. शेजारच्या डीश कडे पाहिले, एका बाऊल मध्ये हिरवा पातळ पदार्थ दिसला. खूपदा असं होतं. डीश मध्ये खाद्यपदार्थ घेतांना त्या पदार्थाच्या अवतारावरूनच घ्यावं की घेऊ नये हा निर्णय होत असतो. हिरव्या कढीच्या बाबतीत पहिल्यांदाच माझा निर्णय चुकला. डीश संपत आली आणि पुन्हा हिरव्या कढीकडे वळलो. एव्हाना सारेच लोक कढीवर ताव मारत होते. मी देखील एक बाऊल कढी संपवली. स्वीट डीश सवयीप्रमाणे घेतली आणि खानसाम्याच्या शोधात निघालो. त्याच्याकडून माहिती घेतली.

या साठी लागणारे साहित्य ५० ग्रॅम दही, एक वाटी दूध, लसणाच्या दोन लहान पाकळ्या, थोडंसं आलं, सात-आठ पानं कढीपत्ता, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक लहान हिरवी मिरची, साखर आणि मीठ चवीप्रमाणे.

सर्वप्रथम दूध आणि मीठ सोडून वरील सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करून घ्यावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर वेगळ्या भांड्यात काढून त्यात दूध व मीठ घालून एकजीव करावे.कढी पातळ हवी असल्यास त्यात थोडे पाणी घालावे. जेवणाच्या आधी प्यायची असल्यास थंड सर्व्ह करावी.

वैशिष्टये :- ही कढी पटकन तयार होते. तसंच फोडणीशिवाय असल्यामुळे पोटात तेल जात नाही.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही