नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


क्रौंचवध - वि. स. खांडेकर

Go down

क्रौंचवध - वि. स. खांडेकर Empty क्रौंचवध - वि. स. खांडेकर

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:24 pm

क्रौंचवध - वि. स. खांडेकर 8296_MahaS

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी साहित्याला आधुनिकतेची वाट दाखवणारे दोन ज्येष्ठ साहित्यिक होते ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर. त्या काळात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, न. चिं. केळकर अशी काही मंडळी आपल्या लेखणीतून समाजाला काही नवा विचार देऊ पाहत होती. तर नाथमाधव, ह. ना. आपटे यांच्यासारखे कादंबरीकार आपल्या कादंबर्‍यांमधून एकीकडे समाजाचे प्रबोधन करतानाच त्याचे मनोरंजनही होईल, अशी दक्षता घेत होते. त्या काळात फडके आणि खांडेकर अशी दोन नावं अचानक चमकू लागली. दोघेही कादंबरीकार होते आणि मनोरंजनाच्या वाटेवरूनच जाणारी त्या दोघांचीही लेखणी होती. तरीही त्या दोघांचा साहित्यप्रवास हा पूर्णपणे वेगळा होता. फडके हे 'कलेसाठी कला' या विचारांचे होते, तर खांडेकर हे 'जीवनासाठी कला' हा विचार मांडू पाहत होते. त्या काळात या विषयावरून जोरदार चर्चा आणि परिसंवादही होत असत. फडके यांचे लिखाण हे निव्वळ मनोरंजनपर आणि प्रणयप्रधान असे आणि खांडेकरांच्या लेखनातही प्रेमाला मज्जाव नसला, तरी ते प्रेम 'बांधू न शकले, प्रीतीचे वा कीर्तीचे धागे!' अशा प्रकारचे असे. फडके यांचा नायक आपल्या प्रेमासाठी स्वत:चे प्राणही द्यायला तयार असायचा, तर खांडेकरांचा नायक प्रेयसीवरील प्रेम आणि देशावरील प्रेम यांच्या कात्रीत सापडल्यावर अर्थातच प्रेयसीकडे पाठ फिरवून देशासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार व्हायचा. खांडेकरांच्या लिखाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून सतत झिरपत राहणारा बोधवाद. सतत पेरलेली सुभाषितवजा वाक्यं आणि आदर्शवादी साहित्याचे सतत येत राहणारे संदर्भ अर्थात, हे सारं प्रेमकहाणीच्याच पार्श्वभूमीवर होत असल्यानं वाचक ते लिखाण पुरं झाल्याशिवाय हातातून खाली ठेवायला तयार नसायचा. -आणि हे काही केवळ फन्नास वर्षांपूर्वीच होत असे, असं बिल्कूलच नाही. आजही खांडेकरांचं लिखाण तितक्याच तन्मतेने वाचणारा एक वर्ग आहेच.

खांडेकरांनी अनेक कादंबर्‍या लिहिल्या. पण 'ययाती' या कादंबरीनं त्यांचं नाव देशात दुमदुमलं आणि 'ज्ञानपीठ' हा साहित्यातील सर्वोच्च सन्मानही त्यांना लाभला. 'ज्ञानपीठ पुरस्कार' मिळालेले खांडेकर हे पहिले मराठी साहित्यिक. त्यांच्यानंतर कवी कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांनाही या सन्मानानं गौरवण्यात आलं. पण हा पुरस्कार प्राप्त होण्याआधीच खांडेकरांच्या अनेक कादंबर्‍यांची विविध भारतीय भाषांत भाषांतरं झाली होती. ज्येष्ठ राजकारणी आणि साहित्यिक नरसिंह राव यांनीच त्यांच्या कादंबर्‍यांचे तेलुगु भाषेत अनुवाद केले होते.

'क्रौंचवध' ही खांडेकरांच्या सार्‍या लेखनवैशिष्ट्यांचे दर्शन घडवणारी एक भावमधुर कादंबरी आहे. तो काळ जसा आधुनिकतेच्या दिशेने तरुण-तरुणींना घेऊन जाणारा होता, तसाच स्वातंत्र्य चळवळीचा आणि महात्मा गांधी-पंडित नेहरू यांच्या प्रेमामुळे भारलेल्या आदर्शवादी युवक-युवतींचाही होता. शिवाय, देशातील अनेक संस्थानं आणि तेथील संस्थानिक तसेच त्यांचे वेगवेगळे कायदेकानून. यामुळेही काहीसं वेगळंच जीवन बघायला मिळत असे. हे सारं वातावरण खांडेकरांनी 'क्रौंचवध' या कादंबरीत रसरशीतपणे उभं केलं आहे. संस्कृत वाङ्मयावर नितांत प्रेम असणारा एक प्राध्यापक आणि त्याची एकुलती एक देखणी आणि शिवाय विविध कला-साहित्य यात रस असणारी कन्या सुलू. आईवेगळ्या या कन्येवर पित्याचं अत्यंत प्रेम. शिवाय, हा रसिक प्राध्यापक छंद म्हणून सतारीचे बोल छेडणारा. एका संस्थानिकाच्या कॉलेजमध्ये तो शिकवतोय. खरं तर तो मनानं अगदी भावूक आणि संवेदनशील. पण तरीही बुद्धिवादी.

महात्मा गांधींच्या चळवळीची टर उडवणारा. एका विद्यार्थ्याला तो शिकवण्यासाठी आपल्या घरी ठेवून घेतो. त्याला संस्कृतचं प्राध्यापक करण्याचं स्वप्न पाहतो. पण हा युवक महात्माजींच्या चळवळीत ओढला जातो. क्रांतिकारकांचा भक्त बनतो आणि मग पुढे तुरुंगातही जातो. दरम्यान, सुलूचं लग्न एका व्यवहारवादी डॉक्टरशी होतं. पण तिच्या मनातनं तो युवक जात नाही. पती तिला व्यवहार शिकवू पाहत असतो, तर हा चळवळीत उतरलेला युवक तिला कठोर वास्तव दाखवत असतो. या संघर्षाच्या कहाणीला खांडेकरांनी नेपथ्याचा उभा केलेला विशाल पट हा संस्कृत साहित्याचा जसा आहे, त्याचबरोबर खलील जिब्रान आणि अन्य पाश्चात्य बोधवादी लेखकांच्या विचारांचा. त्यामुळे एकाच वेळी वाचक जसा प्रेमकहाणीत रंगून जातो, त्याचबरोबर त्याला खरं काय आणि खोटं काय, व्यवहार म्हणजे काय आणि आदर्शवाद म्हणजे काय, याचेही धडे मिळत राहतात.

त्यामुळेच आज सारा काळ आणि जीवनाचे तसेच नैतिकतेचेही निकष बदललेले असतानाही 'क्रौंचवध' ही केव्हाही हातात घेऊन कुठूनही उघडून वाचायला सुरुवात करावी अशी अजरामर कादंबरी होऊन गेली आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही