नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


प्रतिष्ठान उर्फ पैठण

Go down

प्रतिष्ठान उर्फ पैठण

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:14 pm


जरतारी मोर असलेली पैठणी कपाटात हवीच असा आग्रह आजही मराठी स्त्रीयांचा असतो. पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरुन पडले ते पैठण गेली. २५०० वर्ष स्वत:चे वेगळेपण महाराष्ट्राच्या इतिहासात ठासून आहे. औरंगाबादपासून अंदाजे ६० की.मी अंतरावर वसलेले पैठण आज छोटेसे गाव दिसत असले तरी ही सातवाहन राजांची राजधानी होती.

प्रतिष्ठान ह्या नावाने पैठण पुर्वी प्रसिध्द होते. पैठणला दक्षिणेची काशी म्हटले जायचे योच काला म्हणजे इथे चालणारा संस्कृत आणि धर्मशास्त्रचा अभ्यास इथल्या पंडितांनी दिलेला निर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभुमी आणि कर्मभुमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रुपांतर करण्यात आले आहे.

एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रुपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजुनही आहे. मंदिराच्या गाभार्‍याध्ये एकनाथांच्या पुजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाघीमंदिर बांधण्यात आले आहे.

फाल्गुन वघ षष्ठीला नाथ षष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.
गोदावरीच्या काळावर नागतीर्थ म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मुर्ती आहे.

असे हे पैठण आजही पुर्वकालीन संपन्नतेच्या खाणखुणा अंगावर बाळगून आहे. सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा कोरीव खांब आजही भग्नावस्थेत उभे आहेत. या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे या विहीरीला शालीवाहनाची विहीर म्हणतात.

एकनाथांच्या विठ्ठलभक्तीने पावन झालेले पैठण बघितले की कळते भक्तीची एकनिष्ठता आणि सोबतच अनुभवाला येतो तो आपला संपन्न सुसंस्कृत इतिहासही.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही