नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


रतनगड (न्हाया)

Go down

रतनगड (न्हाया) Empty रतनगड (न्हाया)

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 9:43 pm

रतनगड (न्हाया) 8629_MahaS

नाशिक जिल्ह्यामधील सटाणे तालुका किल्ल्यांच्या बाबतीत अतिशय समृद्ध आहे. पुर्वी बागलाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या या भागात अनेक दुर्गम गिरीदुर्ग विराजमान झालेले आहेत. या गिरीदुर्गांमधे उत्तर भागामध्ये रतनगड उर्फ न्हाया हा किल्ला आहे.

रतनगडाच्या रांगेत तांबोळ्या, मांगी व तुंगी हे सुळके आहेत. रतनगडाचा माथा ही सुळक्यासारखा दिसतो. त्यामुळे ओळीत असणार्‍या या चारही सुळक्यांमुळे ही डोंगररांग लक्षवेधी ठरते.

सटाणे या तालुक्याच्या गावापासून रतनगडाला जाण्यासाठी एस. टी. च्या बसेसची सोय आहे. रतनगड किल्ल्याच्या नैऋत्य पायथ्याला हरणबारी तलाव आहे. त्याच्या जवळच बोराटा नावाचे गाव आहे. बोराटा पर्यंत एस. टी. ची सोय आहे. बोराटाकडून डोंगरदांडाने चढून रतनगडाच्या उत्तरेला यावे लागते. रतनगडाचा माथा उजवीकडे ठेवून आडवे चालत गेल्यावर रतनगडावरुन (ईशान्यटोककडून) खाली येणारी डोंगरधार दिसते. याच धारेवरुन गडावर जाणारा मार्ग आहे.

रतनगडाला जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे सटाणे-ताहराबाद-दसवेल फाटा-भिलवड असा आहे. या गाडीमार्गाने आपण भिलवड पर्यंत पोहोचू शकतो. भिलवड मांगी तुंगी या सुळक्यांच्या पायथ्याशी आहे. पायथ्याला असलेल्या जैन मंदिरामधे राहण्याची सोय उत्तम आहे.

भिलवड पासून तासाभराच्या चालीने आपण रतनगडाच्या पायथ्याला पोहोचतो. पायथ्यापासून रतनगडाचा डोंगर चढून आपण ईशान्य धारेपाशी येतो. येथे बोराटागावाकडून आलेली पायवाट आपल्याला लागते.

रतनगडावर चढण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील कातळात एक साधारण असा अवघड टप्पा आहे. तो काळजीपुर्वक चढावा लागतो. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर माथ्याच्या लहानशा पठारावर सुळका उठावलेला दिसतो. पठारावर गडपणाच्या खाणाखुणा आढळतात. सुळक्याच्या पायथ्याला कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. वरच्या कातळमाथ्याला पूर्ण फेरी मारता येते.

रतनगडावरुन आजूबाजूचा परिसर उत्तम दिसतो. तांबोळ्या, मांगी-तुंगीचे दृष्य अप्रतिम दिसते. साल्हेर, सालोटा, हारगड, मोरा, मुल्हेर, चौल्हेर, कर्‍हा, पिसोळ, देरमाळ किल्ल्या बरोबरच धुळे जिल्ह्यामधील भामेरचे ही दर्शन होते. गुजरात मधील डांग जिल्ह्याचा विस्तृत भाग दिसतो. यात पिंडवल किल्ल्याबरोबर विल्सन हिल ही दिसते.

परतीच्या वाटेवर निघताना भिलवडकडे उतरणे सोयीचे ठरते. भिलवडकडून वाहनांची सोय बर्‍यापैकी आहे. भिलवड येथे पोहोचल्यावर याच भ्रमंतीमधे मांगी-तुंगी ही पहाता येईल.

प्रमोद मांडे

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही