नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


वसंतलावण्य - मधू पोतदार

Go down

वसंतलावण्य - मधू पोतदार Empty वसंतलावण्य - मधू पोतदार

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 9:39 pm

'कसं काय पाटील बरं हाय का?
काल काय ऐकलं ते खरं हाय का?'


अशी समोरच्याला थेट सवाल करणारी लावणी असू द्या की,
'तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं,
सोळावं वरीस धोक्याचं ग, सोळावं वरीस धोक्याचं!'


अशी यौवनाच्या ऐन उंबरठ्यावर उभ्या असलेल्या युवतीला इशारा देणारी लावणी असू द्या...
किंवा 'अवघाची संसार'सारख्या अजरामर चित्रपटातलं 'जे वेड मजला लागले...' यासारखं चिरतरुण गीत असू द्या
किंवा
'बाळा जो जो रे,
पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्याची पाखरे'


यासारखं कधीही विस्मृतीत जाऊ न शकणारं अंगाईगीत असू द्या...
वसंत पवार यांनी अशी असंख्य आठवणीतली गाणी आपल्याला दिली आणि आपलं भावविश्व समृद्ध करून सोडलं.

वसंतरावांनी अंगाईगीतांपासून अभंगांपर्यंत आणि पोवाड्यांपासून लावण्यांपर्यंत विविध प्रकारच्या गीतरचना केल्या आणि गाण्याचा प्रकार कोणताही असो, वसंतरावांच्या चालीत काही ना काही नावीन्य हे असायचंच.

तरीही आज वसंत पवार हे नाव घेतलं की मराठी चित्रपटरसिकाच्या ओठावर नाव येतं ते 'सांगत्ये ऐका!' हेच. या चित्रपटातील वसंत पवार यांची सगळीच्या सगळी गाणी गाजली. चित्रपटही तुफान चालला आणि मराठी सिनेमाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही प्रस्थापित झाले. 'बुगडी माझी सांडली ग..' हे गीत तर आशा भोसले यांच्या संगीतप्रवासातील एक मैलाचा दगड बनून गेलं आहे.

मराठी संगीताच्या इतिहासात 'वसंत' या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीतरसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. अशाच एका संगीतप्रेमींपैकी मधू पोतदार हे एक गृहस्थ. पोतदार हे स्टेट बँकेत कामाला होते. पण मराठी गाण्यांचं त्यांना अपरंपार प्रेम होतं. त्यातही या तीन वसंतांच्या गीतांनी तर त्यांना पार वेडं केलेलं होतं. या तिन्ही संगीतकारांची चरित्रगाथा पुस्तकरूपानं मराठी संगीतप्रेमींना उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्धार केला होता आणि मुख्य म्हणजे त्यांनी तो तडीसही नेला. त्यातूनच उभं राहिलेलं ‘वसंतलावण्य’ हे पुस्तक वसंत पवार यांची कहाणी आपल्यापुढे अत्यंत मनोज्ञ पद्धतीनं उभी करतं आणि आपल्याला एका वेगळ्याच सृष्टीत घेऊन जातं.
वसंत पवार यांच्याविषयी आजवर कुणालाही ठाऊक नसलेली अदभूत अशी माहिती जशी पोतदार यांच्या अथक परिश्रमातून आपल्यापुढे या पुस्तकातून उभी राहते, त्याचबरोबर किती कठीण परिस्थितीत वसंत पवार यांना आपलं आयुष्य काढावं लागलं, तेही आपल्याला कळत जातं आणि अचंबित व्हायला होतं. पवार वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी हे जग सोडून गेले. अडतीस वर्षांच्या काळात पवारांनी संगीताचा अक्षरश: खजिना आपल्याला दिला. पवार गेले, तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अग्रगण्य अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. त्यांना पवारांच्या पत्नींनी सांगितलं की पार्थिव पहिल्यांदा चर्चमध्ये न्यायला लागेल, तेव्हा अनेकांना पवार हे ख्रिश्चन होते, हे ठाऊक झालं. कोणालाही कल्पना करता येणार नाही, इतकं खडतर जीवन पवारांच्या वाट्याला आलं होतं. पण पवार त्यातूनच शिकत गेले आणि मोठे झाले.

प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांनी या कहाणीला लिहिलेल्या प्रस्तावनेत अगदी मोजक्याच शब्दांत वसंत पवारांचं कर्तृत्व आणि त्याचबरोबर पोतदार यांनी घेतलेले परिश्रम यांचं मोल व्यक्त झालंय. विश्वास पाटील लिहितात : ‘वसंतरावांचं अवघं आयुष्य म्हणजे एक कादंबरी आहे. जीवनाची इतकी परवड, इतके उन्हाळे-पावसाळे क्वचितच एखाद्या कलावंताने बघितलेले असतील. अवघे अडतीस वर्षांचे अल्पायुष्य लाभलेल्या वसंत पवार नामक अवलिया संगीतकाराने महाराष्ट्राला द्यावे तरी काय काय? राम कदमांसारखा खंदा संगीतकार, सुमन कल्याणपूर यांच्यासारखी श्रेष्ठ गायिका, सुलोचना चव्हाण यांच्यासारखी लावणीसम्राज्ञी, जगदीश खेबुडकरांसारखा मोठ्या श्वासाचा गीतकार. एका प्रकारे गुणी माणसे जन्माला घालणारा हा रसिकराज लावण्या, अभंग, भावगीते, युगलगीते, सवाल-जवाब, झगडे, पोवाडे, फटके किती प्रकार? अशा या अचाट स्मरणशक्तीच्या, अलौकिक प्रतिभाशाली संगीतकाराची जीवनगाथा आणि त्याचबरोबर संगीताचा सुवर्णमय इतिहास मधू पोतदारांनी शब्दबद्ध केला आहे.’
असे हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशना’चं आपण कायम ऋणी राहायला हवं.

प्रकाश अकोलकर

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही