नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords

ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड बोंबिल'ची ऑर्डर दिली जाते. थोड्याच वेळात ब्रेडरोलसारखा तपकिरी रंगावर डीप फ्राय केलेला पदार्थ समोर येतो. मग घाईतच वडे किंवा भाकरीबरोबर ताव मारण्यासाठी फोडला जातो आणि मग केवळ चित्कारणंच बाकी असतं. कारण, बोंबलांच्या कुरकुरीत आवरणाच्या आत चक्क मस्त तळलेली मसालेदार कोळंबी भरलेली असते. बोंबिल आणि कोळंबीची ती मिश्र चव... अहाहा!!! वर्णनासाठी तोंड उघडतच नाही. ते उघडतं केवळ 'स्टफ्ड बोंबिल' खाण्यासाठीच...

परळच्या एसटी डेपोजवळ असलेल्या 'जयहिंद लंच होम'ची 'स्टफ्ड बोंबिल' ही जणू खासीयत. पण केवळ तेवढंच नाही, पापलेट, सुरमई, हलवा, कोळंबीचे नानाविध मस्त-मसालेदार पदार्थ ही 'जयहिंद'ची ओळख आहे. तळलेले मासे असोत किंवा माशांचं कालवण, तिखलं, पुलिमंची (तुळु पद्धतीचं कालवण)असो, सगळंच अफलातून. अस्सल चवीचं, अस्सल प्रतीचं. ते खाताना आधी मसाल्याचा वासच नाकात भरतो आणि तिथेच पदार्थ उत्तम जमल्याची खात्री पटते.

खरंतर आजवर 'मालवणी पध्दतीचं हुकमी जेवण' हिच 'जयहिंद'ची ओळख होती. पण आता केवळ मालवणी नाही, तर एकूणच 'सी-फूड'साठी 'जयहिंद' नावाजलं जातं. त्यासाठीच बहुतांशी हॉटेलांमध्ये पापलेट, सुरमई, कोळंबी आणि बोंबिल अशा मोजक्याच माशांना स्थान असताना 'जयहिंद' मध्ये मात्र मोरी, मांदेली, जिताड, मुडदुसे, तालीर् अशा कोकण किनारपट्टीवर मिळणारे सर्व मासे खवय्यांना उपलब्ध करून दिले आहेत. तसंच केवळ कोकणी स्टाइलमध्ये नाही, तर पापलेट तंदुरी, सुरमई चिली, प्रॉन्स विंदालु, चिकन हैदाबादी, मटण रोगनजोश अशी मासे आणि चिकन-मटणची व्हरायटी इथे आहे. 'स्टफ्ड बोंबिल' हाही असाच पदार्थ आणि ही व्हरायटी खवय्यांच्या पसंतीस उतरू लागली आहे.

अर्थात, कितीही व्हरायटी असल्या आणि त्या अस्सलच असल्या, तरीही 'जयहिंद'मधील पदार्थांवर वरचष्मा आहे तो कोकणी खाद्यसंस्कृतीचा. केवळ चवच नाही, तर वासासकट सगळे मांसाहारी पदार्थ अस्सल कोकणी स्टाईल आहेत. थेट कोकणातल्या एखाद्या कोकणी कुटुंबातल्या गृहिणीने केल्यासारखे.

शाकाहारी ते मांसाहारी, दाक्षिणात्य ते मालवणी...

' जयहिंद'च्या खानसाम्यांना हे कसब कसं जमलं, ते बघण्यासारखं आहे. अर्थात त्यासाठी थोडी 'जयहिंद'ची हिस्ट्रीही जाणून घ्यावी लागते. आजच्या 'जयहिंद लंच होम'च्या जागी १९५० च्या दरम्यान 'जयहिंद भोजनालय' हे शुध्द शाकाहारी हॉटेल होतं. जगन्नाथ ओक यांच्या या भोजनालयात तेव्हा, क्राऊन मिलमध्ये बदली कामगार म्हणून काम करणारे दासू शेट्टी पार्टटाइम काम करायचे. त्यांचा कामातला प्रामाणिकपणा लक्षात घेऊन पुढे ओक यांनी ते भोजनालय शेट्टी यांनाच चालवायला दिलं. शेट्टींनी शाकाहारी 'जयहिंद' मांसाहारीही केलं. परंतु, ते कर्नाटकातील उडपीचे असल्यामुळे सगळं जेवण दक्षिणी स्टाईलचंच असायचं. तरीही त्या परिसरात दुसरं हॉटेल नसल्यामुळे अनेक वर्षं 'जयहिंद' हे परळ डेपोतील कर्मचाऱ्यांचं आणि प्रवाशांचंही हक्काचं ठिकाण असायचं. त्यामुळे तेव्हा ते 'एस.टी कॅन्टीन' म्हणूनच ओळखलं जायचं. पुढे १९९२-९४ला परळ एरियाने कात टाकायला सुरुवात केली आणि १९९८मध्ये आजचं 'जयहिंद लंच होम' आकाराला आलं. अर्थात नुस्तं बाह्यस्वरूप बदलून चालणार नव्हतं. मग लोअर परळच्या चाळीतच वाढलेली दासू शेट्टींची नंदू शेट्टी आणि गिरीश शेट्टी ही मुलं कोकणात गेली आणि तिथली खानावळी-हॉटेलं पालथी घालून आली. या भटकंतीत त्यांनी कोकणी मांसाहारी पदार्थार्ंच्या पाककृतीच नाही, तर मसाले तयार करण्याच्या पद्धतीही अभ्यासल्या आणि इथे येऊन स्वत:ची नवी स्टाइल डेव्हलप केली. तीच आजही 'जयहिंद'ची खासीयत आहे. याचं श्रेय विशेषत: नंदू शेट्टी यांना द्यावं लागेल. कारण पाककलेची आवड असल्यामुळे त्यांनीच सुरुवातीच्या काळात मांसाहारी जेवण रांधलं आणि ग्राहकांना वाढलं. आज त्यांच्या हाताखाली तयार झालेले आचारी जेवण बनवत असले, तरी नंदू शेट्टी यांचं बारीक लक्ष त्यांच्यावर असतं.

म्हणूनच वर्षं बदलत गेली, तरी 'जयहिंद'च्या मसाल्याची चव अजून बदललेली नाही


Comments: 0

Social bookmarking

Social bookmarking digg  Social bookmarking delicious  Social bookmarking reddit  Social bookmarking stumbleupon  Social bookmarking slashdot  Social bookmarking yahoo  Social bookmarking google  Social bookmarking blogmarks  Social bookmarking live      

Bookmark and share the address of on your social bookmarking website

Poll
September 2018
SunMonTueWedThuFriSat
      1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30      

Calendar Calendar

Statistics
आमच्याकडे 32 नोंदित सदस्य आहेत
नविनतम सदस्य rohit mate हा अहे

आमच्या सदस्यांनी 356 इतके लेख लिहिले आहेत in 316 subjects
RSS feeds


Yahoo! 
MSN 
AOL 
Netvibes 
Bloglines